बीड- बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर अनधिकृत अन अधिकृत वाळू उपसा सुरू आहे.सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत,वाळू माफिया मोकाट आहेत या सगळ्या गोष्टी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना माहीतच नव्हत्या का?प्रशासन इतक्या दिवस झोपा काढत होतं का?आमदार कधी उपोषण करतात अन आपण कधी वाळू कंत्राटदार यांची बैठक घेतो याची वाट पाहत […]
गुजरात मध्ये तस्करीसाठी निघालेला तांदूळ जप्त !
बीड – काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल 27 हजार किलो तांदूळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडला.सात लाखाच्या तांदळासह तब्बल 31 लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. माजलगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील युसूफ इसाक आतार हा व्यक्ती रेशनच्या अन्नधान्याचा काळाबाजार करत असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली.त्यानंतर […]
ट्रक बस अपघात,सहा ठार !
अंबाजोगाई – बीडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी लातूर-अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झालेत. लातूर औरंगाबाद ही बस लातूर घेऊन निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई ऊन लातूरकडे जात होता.जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी […]
राजेंद्र मस्के वगळता इतर आरोपींना जामीन !
बीड- स्वतःच्या मालकीच्या जागेत जुगार अड्डा चालू असल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जामीनाबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.मस्के एकीकडे पत्रकार परिषद घेत असताना दुसरीकडे पोलीस मात्र तपास करण्यात गुंग आहेत.या प्रकरणातील इतर 47 आरोपींना जामीन झाला मात्र मस्के यांनी ना जामीन घेतला ना पोलिसांनी त्यांना अटक केली. बीड शहरानजीक असलेल्या […]
लोकल पोलीस,एस पी च नेटवर्क करत काय ?
बीड – एकीकडे जिल्ह्यात मटका,गुटखा,वाळू,पत्याचे क्लब,अवैध दारू असे सगळे प्रकार सुरू आहेत तर दुसरीकडे पंकज कुमावत यांचं पथक गेल्या काही महिन्यांपासून या धंद्यावर कायद्याचा फास आवळत आहेत.हे धंदे जर एवढ्या बिनधास्तपणे जिल्ह्यात सुरू आहेत तर लोकलचे पोलीस आणि एसपी,डीवायएसपी यांचं नेटवर्क नेमकं करतंय काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकल पासून ते शुगर पर्यंत सगळ्यांचेच या अवैध […]
पोलीस दप्तरी फरार आबा मुळे अखेर गजाआड !
बीड – पोलिसांशी तोडीपाणी करत आपला गुटख्याचा धंदा बिनबोभाटपणे करणारा महारुद्र उर्फ आबा मुळे अखेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.बीड जिल्ह्यात जवळपास चार ते पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले तरी मुळे आबा चा गुटखा तस्करी चा धंदा सुरूच होता.शेवटी कागदोपत्री का होईना अटक दाखवायची म्हणून पोलीसांच्या पथकाने त्याला अटक केली . बीड जिल्ह्यात पोलिसांच्या आशीर्वादाने शिवसेनेच्या […]
देवी पावली ! घटस्थापनेपासून मंदिर खुली !
मुंबई – राज्यातील कोरोनाचे सावट कमी होत असल्याने येत्या 4 ऑक्टोबर पासून शाळा तसेच 7 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापना पासून मंदिर उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे . घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडली जाणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव […]
धनुभाऊ एकदा वाळूपट्यात दौरा करा !वाळू माफियांना सोलून काढा !!
बीड – धनुभाऊ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आपण थेट बांधावर जाऊन धीर दिला त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे मात्र असाच दौरा एकदा आष्टी ते परळी काढा अन नद्यांचे विद्रुपीकरण करून वाळूचा धंदा करणाऱ्या तुमच्या स्वपक्षीयांसह इतरांचे ढोपर सोलून काढा !जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात राजकीय वाळू माफिया निर्माण झाले आहेत अन पोलीस ,महसूल ला हाताशी धरून […]
पोलीस दलातील मुजोरीला कोणी आळा घालणार आहे का ?
बीड – एकीकडे खून करणाऱ्या आरोपीला सोडून देणारे शिरूरचे पोलीस तर दुसरीकडे बेपत्ता असलेल्या मुलीच्या बापाला चाळीस हजार रुपयांची मागणी करणारे दिंद्रुड चे पोलीस आणि हे सगळं गप्प बसून उघड्या डोळ्यांनी पाहणारे पोलीस अधीक्षक यामुळे बीड पोलीस दलाची अब्रू पार वेशीला टांगली गेली आहे . बीड पोलीस दलात नेमकं चाललंय काय हेच कळायला मार्ग नाही […]
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिरूर पोलिसांनी सोडून दिले !
शिरूर कासार – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिरूर कासार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिनबोभाटपणे सोडून देत पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांच्यासहित पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगली आहे .विशाल कुलथे हा सराफा चा व्यापारी बेपत्ता झाल्यानंतर तो सगळ्यात शेवटी गायकवाड नावाच्या मित्रा सोबत अनेकांनी पाहिला होता मात्र शिरूर चे पोलीस निरीक्षक माने […]