News & View

ताज्या घडामोडी

Tag: #परळी

  • जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!

    बीड- केशरी कुपन धारकांना यापुढे रेशन ऐवजी रोखीने पैसे मिळणार आहेत.राज्य शासनाने जानेवारी2023 पासून ही योजना लागू केली आहे मात्र त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यात केशरी कुपन धारक लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे.त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे,जसजसे अर्ज येतील तसतसा या योजनेचा लाभ थेट त्या लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती…

  • साडेतीन हजार अतिक्रमण धारकांना नोटिसा !

    आष्टी- सरकारी गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिल्याने तालुक्यातील तब्बल साडेतीन हजार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महिनाभरात अतिक्रमण नियमित करून घ्या अन्यथा प्रशासन अतिक्रमण काढून घेईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्यातील अनेक भागातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. दरम्यान अशाच काही नोटीस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील…

  • पोलीस निरीक्षकाला अटक !

    परळी- पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी परळी येथील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सीआयडी ने अटक केली आहे.अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेने खळबळ उडाली आहे. 2014 साली परळी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत सदर…

  • जालना महापालिकेला शासनाची मंजुरी !

    जालना- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा रावसाहेब दानवे,माजीमंत्री अर्जुन खोतकर,माजीमंत्री राजेश टोपे यांचं होम टाऊन असलेल्या जालना नगर परिषद ला महापालिकेत रूपांतरित करण्याचा ठराव राज्य शासनाने पारित केला आहे.त्यामुळे आता राज्यात 29 महापालिका झाल्या आहेत.महापालिका झाल्याने जालनेकरांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत….

  • सिलेंडर स्फोटात एक ठार चार जखमी !

    परळी- शहरातील बरकत नगर येथे एका घरात सिलेंडर चा स्फोट होऊन एकजण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.घराला अचानक लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अदिल उस्मान शेख (वय १४) असं स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोन…

  • वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर ! 12 जूनला निकाल !!

    परळी- भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून 10 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. 11 जून रोजी मतदान होईल तर 12 जूनला कारखान्यावर कोणाची सत्ता येणार याचा निकाल हाती येईल या कारखान्यावर भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व…

  • बालनाट्य शिबिरातून नवी ऊर्जा मिळते- दिपाताई क्षीरसागर !

    बीड -अठरावे बालनाट्य शिबिर हे नवी दिशा देणारे ऊर्जा देणारे ठरले आहे. नाटकाच्या सर्वांगीण विकासासाठी बालकांनी तंत्रज्ञाचे धडे गिरवले, मूकनाट्या सारख्या कला प्रकाराची सखोल माहिती या शिबिरात बालकलावंतांना मिळाली. मनोगतातून व्यक्त होणाऱ्या पालकांच्या, शिबिराथांच्या प्रतिक्रिया या आम्हास प्रेरणा देतात आणि उत्साह वाढवतात असे प्रतिपादन समारोपप्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी केले यावेळी…

  • आरटीई प्रवेश नाकारल्यास फौजदारी कारवाई चा इशारा !

    बीड- आर टी प्रवेशापोटी शासनाकडे थकलेले अनुदान आणि त्यामुळे यावर्षी आरटीई च्या प्रवेशास नकार देण्याची शाळांची कृती नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे त्यामुळे अशा शाळांचा यु-डायस नंबर मान्यता रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिला आहे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात मेस्टा संघटनेच्या वतीने मोफत आरटीई प्रवेश…

  • कृषी अधीक्षक जेजुरकर रजेवर !

    बीड- विधानपरिषद आ सुरेश धस यांच्याशी झालेल्या वादानंतर जिल्हा कृषी अधीक्षक जेजुरकर हे अचानक रजेवर गेले आहेत.धस यांच्यासोबत आलेल्या काही लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता जेजुरकर हे रजेवर गेल्याने या वादाला अधिक तोंड फुटले आहे. पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील कर्मचारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा…

  • निवडणुकीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे- देशपांडे !

    बीड- ग्राम पातळीवर जाऊन मतदारांची नोंद घ्या,मयत किंवा स्थलांतरित मतदार कोणी असतील तर यादी अपडेट करा ,निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही अस म्हणत राज्याचे मूळचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. सन 2024 च्या आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  विविध जिल्हयांना भेटी देत आढावा घेण्यात येत आहे.  गावपातळीवर…