परळी – शहरातील बरकत नगर भागातील शेख सादिक हे दादाहरी वडगाव येथील विहिरीत बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी गेलेला मुलगा शेख रफिक याने प्रयत्न केले.या घटनेत दोघेही बापलेक बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेख सादिक हे त्यांच्या नातेवाईकांसोबत दादाहरी वडगाव येथे फिरण्यासाठी गेले होते.यावेळी विहिरीवरून पाणी काढत असताना पाय घसरून ते विहिरीत पडले.त्यांना वाचविण्यासाठी […]
डॉ सुदाम मुंडेला जामीन !
औरंगाबाद- राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणी आरोपी असलेल्या सुदाम मुंडेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुदाम मुंडेला 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर सुदाम मुंडेला औरंगाबाद खंडपीठाने जामीन देतेवेळी 5 वर्षासाठी वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. तदनंतरही बीडच्या जिल्हाधिकार्यांकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बोगस डॉक्टर शोध कमिटीने […]
परळीतील दहा सिंचन प्रकल्पांना मान्यता !
मुंबई – परळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे करत असलेल्या पाठपुराव्यास मोठे यश आले असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज परळी मतदारसंघातील प्रस्तावित 23 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तातडीने देऊन त्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्याचे निर्देश ना. पाटील यांनी विभागाला दिले आहेत. जलसंपदा मंत्री […]
मिटकरी वर गुन्हा दाखल करण्यासाठी परळी ठाण्यात नागरिकांचा ठिय्या !
परळी – परळीतील हिंदुधर्मीय नागरिक व ब्राह्मण समाजाने आज पोलिस ठाण्यात ठिय्या धरला असून धर्मद्रोही असलेल्या अमोल मिटकरी वर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. शहरातील विठ्ठल मंदिर येथून मोठ्या संख्येने मूक मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन शहर पोलीस ठाण्यात आले. या ठिकाणी पोलीस निरीक्षकांना अमोल मिटकरी याच्यावर […]
स्वस्तात सोने !आरोपींना गुजरात बॉर्डरवरून ठोकल्या बेड्या !!
परळी – स्वस्तात सोने खरेदी करणे परळीच्या व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले.मात्र पोलिसांच्या मेहनतीला वर्षभरानंतर यश आले अन गुजरातच्या बॉर्डर पासून दोन कुख्यात आरोपींना अटक केली.विशेष म्हणजे या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना अनेक दिवस वेष बदलून मेहनत घ्यावी लागली. गेल्या वर्षापूर्वी एक व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला एक चतुर […]
धनंजय मुंडे यांनी शब्द पाळला !शहरासाठी 63 कोटींच्या कामांना मंजुरी !!
परळी – परळी शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत परळी येथील नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित केलेल्या 63 कोटी 23 लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून, निवडणुकांपूर्वी शहरातील उर्वरित रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा दिलेला शब्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पूर्ण केला आहे. याआधी नगरोत्थान विकास प्रकल्प टप्पा एक अंतर्गत सुमारे 40 […]
आर्थिक वादातून महिलेची हत्या !
परळी -परळी परीसरातील वाढत्या गुन्ह्याच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत.आज गावाजवळ असलेल्या आयेशा नगर येथे एका – ५० वर्षीय महिलेची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात त्या महिलेची १६ वर्षीय मुलगी देखील जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २६) दुपारी समोर आली. मयत महिलेचे नाव शेख मदिना शेख मंजीद […]
परळीत व्यापाऱ्याची आत्महत्या !
परळी – ग्लास अँड फर्निचर चा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याने दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेने परळी शहरातील अरुणोदय मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परळी शहरातील अरुणोदय मार्केट मध्ये प्रवीण मालेवार यांचे गायत्री ग्लास अँड फिटिंग हे फर्निचर चे दुकान आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ते येथे व्यवसाय करतात.दरम्यान शुक्रवारी सकाळी […]
जलयुक्त शिवार घोटाळा ! तीन जणांना अटक !!
बीड – बीड जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यात तीन जणांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. काँगेस चे वसंत मुंडे यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. आता यात सेवानिवृत्त झालेल्या कृषी सहायकांना अटक झाल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत. जलयुक्त शिवारच्या कामात अनियमितता आणि गैरप्रकार याचा तपास करण्यासाठी पाच पथकामार्फत चौकशी करण्यात आली […]