माजलगाव – अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचे तीन प्रियकरांच्या मदतीने दोन तुकडे करून जिल्ह्याबाहेर नेऊन टाकणाऱ्या घटनेचा पोलिसांनी नऊ महिन्यांनी उलगडा केला आहे.नवऱ्याचा खून करणारी बायको मात्र अद्याप फरार असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथील दिगंबर गाडेकर हे सप्टेंबर2021 पासून घरातून गायब होते.संजय गांधी निराधार योजनेचे काम करणाऱ्या गाडेकर यांच्या […]
डीवायएसपी लोढा यांचा वाळू माफियांना दणका !
गंगाखेड – एकीकडे बीड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पुढाऱ्यांच्या सहकार्याने वाळू माफियांनी हैदोस घातला असताना दुसरीकडे बीडचे सुपुत्र तथा गंगाखेड चे पोलोस उपाधीक्षक श्रेणीक लोढा यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत.तब्बल 98 वाळू माफियांवर गुन्हे दाखल करत लोढा यांनी 38 आरोपी ताब्यात घेतले आहेत.या कारवाईत पोलिसांनी साडेसात कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. परभणी जिल्ह्यात वाळू माफियांनी […]
लाखोंचा गुटखा जप्त ! कुमावत यांची कारवाई !!
माजलगाव – बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे.अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने मंगळवारी रात्री गुटख्याची तस्करी करणारा ट्रक पकडला.तब्बल 39 लाखाचा माल यावेळी जप्त केला. कर्नाटक राज्यातील संगारेड्डी या गावातून KA 56 5413 हा ट्रक गुटखा घेऊन जालना कडे निघाला असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली.त्यांनी तातडीने […]
गायींची तस्करी करणारा टेम्पो पकडला !
बीड – गोवंश तस्करी आणि कत्तल यावर बंदी असताना देखील अकरा गायी आणि आठ वासरांची तस्करी करणाऱ्यास अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडले.यावेळी एका आरोपीला ताब्यात घेतले असून अन्य एका व्यापाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, आयशर टेम्पो क्रमांक एम एच 12 एचडी […]
हवाला रॅकेट ! पुण्यात पोलिसांवर कारवाई,बीडमध्ये मात्र मेहरबानी !!
बीड – हवाला व्यावसायिकांना धमकावून खंडणी गोळा केल्या प्रकरणी जर पुण्याच्या आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर कारवाई होऊ शकते तर बीड मधील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. बीड शहर ठाण्याच्या हद्दीत हवाला रॅकेट वर कारवाई झाली मात्र इतके दिवस हे रॅकेट पोलिसांच्याच आशीर्वादाने […]
हवालाचा भोसले सुटला की सोडला !!
बीड – बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सानप यांच्या आशीर्वादाने सुरु असलेले हवाला रॅकेट कुमावत यांच्या पथकाने उध्वस्त केले .मात्र यावेळी खरा मास्टर माईंड असलेला सचिन भोसले याला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले की त्याला रेड करणाऱ्यांपैकी एखाद्या ओळखीच्याने सोडून दिले अशी चर्चा होत आहे. बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा,मटका,हवाला,पत्ते, चकरी,क्रिकेटचा सट्टा मोठ्या प्रमाणात चालतो.शहर […]
हॉटेलमध्ये सुरू असलेल्या क्लबवर छापा !
आष्टी – बीड अहमदनगर महामार्गावरील वाघळूज शिवारात साई भक्ती हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घातला.यावेळी तब्बल 18 जुगारी अन अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दकडा ते अहमदनगर रस्त्यावर वाघलूज शिवारात हॉटेल साई भक्ती मध्ये अशोक एकनाथ खकाळ हा काही लोकांना एकत्र बसून जन्ना मन्ना पत्त्याच्या […]
हवाला रॅकेट उध्वस्त ! बीड शहरच्या नाकावर टिच्चून कारवाई !!
बीड । वार्ताहरशहरातील विविध भागात कार्यालये थाटून हवाला रॅकेट सुरु असल्याचा प्रकार बीडमध्ये उघड झाला आहे. कर चूकवून खुलेआमपणे नियमबाह्यपणे, अवैधरित्या ‘हवाला’ रॅकेट चालवले जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच शहरातील कबाडगल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स व सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एक ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलीसांनी तीन ठिकाणाहून एकूण 51 लाख 26 […]
गोमांस विक्री करणारी टोळी उध्वस्त !
आष्टी – आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथे गाय आणि बैलाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केला.यावेळी साडेसहा लाखाचे मांस आणि वाहने मिळून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.एकूण अकरा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दौलावडगाव येथील खलील कुरेशी आणि दलील कुरेशी हे दोघे डोंगराच्या पायथ्याला […]
गुजरात मध्ये तस्करीसाठी निघालेला तांदूळ जप्त !
बीड – काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल 27 हजार किलो तांदूळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडला.सात लाखाच्या तांदळासह तब्बल 31 लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. माजलगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील युसूफ इसाक आतार हा व्यक्ती रेशनच्या अन्नधान्याचा काळाबाजार करत असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली.त्यानंतर […]