अंबाजोगाई – जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनुभाऊ तुम्ही तब्बल सतरा कोटी रुपये खर्चून अंबाजोगाईत एस आर टी रुग्णालयासाठी एमआरआय मशीन मागवली,मात्र सहा महिने झाले तरी एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन न जोडल्याने कोट्यवधींची मशीन धूळखात पडून आहे.धनुभाऊ आता एकदा या मुजोर अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा अन रुग्णसेवेत ही मशीन उपलब्ध करा. राज्याचे सामाजिक न्याय […]
माजी आमदार पुत्रासाठी कायद्याची पायमल्ली !
बीड- बीडचे माजी आमदार सय्यद सलीम यांच्या वाळूचा ठेकेदार असलेल्या मुलांसाठी कायद्याची पायमल्ली करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.महसूल प्रशासन आणि मंत्र्यांना हाताशी धरून सलीम यांनी आपल्या मुलाचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यातील गोदाकाठ हा जिल्ह्यातील राजकीय पुढारी,महसूल चे अधिकारी,पोलीस अधिकारी यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.युध्दाजित पंडित असोत की विजयसिंह […]
शेतकऱ्यांनी संयम बाळगावा-धनंजय मुंडे !
मुंबई-केवळ बीड, परभणी नव्हे ते यावर्षी सबंध महाराष्ट्रात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांच्या अतिरिक्त ऊसाचे गाळप होईपर्यंत बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातील कारखाने सुरू ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने साखर कारखान्यांना दिलेले आहेत. अतिरिक्त उसाच्या प्रश्नामुळे परिस्थिती गंभीर असली तरी राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असे आवाहन करतानाच अगदी […]
एसआरटी च्या नवीन इमारतीसाठी 15 कोटी !
मुंबई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्ण सुविधेसंदर्भात दिलेला शब्द पूर्ण केला असून, रुग्णालयातील 230 खाटांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम करून आणखी काही वॉर्ड व सुविधा निर्माण करण्यासाठी 15 कोटी रुपये खर्चास वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.याबाबतचा शासन निर्णय वैद्यकीय […]
परळीतील दहा सिंचन प्रकल्पांना मान्यता !
मुंबई – परळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे करत असलेल्या पाठपुराव्यास मोठे यश आले असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज परळी मतदारसंघातील प्रस्तावित 23 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तातडीने देऊन त्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्याचे निर्देश ना. पाटील यांनी विभागाला दिले आहेत. जलसंपदा मंत्री […]
पिककर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – मुंडे !
बीड – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरण्या वेळेत करता याव्यात यासाठी बी बियानाचे नियोजन करा तसेच कर्ज पुरवठा वेळेवर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. बीड जिल्ह्यातील शेतकरी ऊस पिकवतो आणि ऊस तोडून बांधून कारखान्यावर पोचवतो, असा कष्ट करणारा वर्ग आहे, त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सवलती वेळेत […]
सामाजिक न्याय विभागांतर्गत महामंडळासाठी वाढीव निधी !
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व असल्याचे गुरुवारी दिसून आले.त्यांच्या खात्यांतर्गत असलेल्या चार महामंडळाच्या निधीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा पूर्वी 500 कोटी होती, ती वाढवून 1000 कोटी करण्यात आली आहे. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा 300 […]
मिटकरी वर गुन्हा दाखल करण्यासाठी परळी ठाण्यात नागरिकांचा ठिय्या !
परळी – परळीतील हिंदुधर्मीय नागरिक व ब्राह्मण समाजाने आज पोलिस ठाण्यात ठिय्या धरला असून धर्मद्रोही असलेल्या अमोल मिटकरी वर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. शहरातील विठ्ठल मंदिर येथून मोठ्या संख्येने मूक मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन शहर पोलीस ठाण्यात आले. या ठिकाणी पोलीस निरीक्षकांना अमोल मिटकरी याच्यावर […]
मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा ला पोलीस कोठडी !
मुंबई-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.न्यायालयाने या महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.रेणू शर्मा ही महिला करुणा शर्माची बहीण आहे हे विशेष. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोबाईल वर मेसेज पाठवून ब्लॅकमेल केलं जातं असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली होती.ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं […]
वाचाळविरं न भयं न लज्जा !!
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर कोणत्याही सर्कस मध्ये सगळ्यात जास्त लक्ष असत ते विदूषक या कलाकार किंवा व्यक्तीवर.कारण त्याला चित्रविचित्र अंगविक्षेप करून लोकांचं मनोरंजन कार्याचा एवढंच माहीत असत तसेच रस्त्याच्या कडेला जर मदाऱ्याचा खेळ सुरू असेल तर त्याच्या हातात जे माकड असतं ते मदारी सांगेल तसच करत असत,कारण त्याला लोकांच्या भावना किंवा डिमांड याच्याशी काही […]