नवी दिल्ली- कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमत असेल आणि तिथे भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास देशाचे गृहमंत्री तथा भाजपनेते अमित शहा यांनी व्यक्त केला. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कर्नाटक मध्ये आपण आतापर्यंत नऊ दिवस दौरे केले आहेत.या ठिकाणी बसवराज बोंमाई यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार विकासाचे काम करत आहे.कानडी जनतेला डबल […]
खा गिरीश बापट यांचे निधन !
पुणे- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ,पुणे भाजपचा चेहरा असणारे खा गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत बापट हे प्रचारात उतरले होते हे विशेष. गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट यांनी […]
शिंदे- फडणवीस काढणार सावरकर गौरव यात्रा !!
मुंबई- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वरून देशभरात सुरू असलेल्या राजकारणात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. हे दोन्ही पक्ष मिळून राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार आहेत या माध्यमातून सावरकर प्रेमी हिंदूंच्या मताचा आकडा आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न होणार हे निश्चित . दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील […]
शेतकरी सन्मान योजनेसाठी नेमक्या काय आहेत अटी !
बीड- शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक अनुदान देण्याच्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला आहे काय?नेमकी काय कागदपत्रे यासाठी लागतात ? कोण ठरू शकत लाभार्थी याची माहिती राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. जे शेतकरी केंद्राच्या योजनेसाठी पात्र असतील त्यांना याचा लाभ मिळणार आहे.राज्यातील 89 लाख लोक यासाठी पात्र ठरणार आहेत. मुख्यमंत्री […]
आष्टीतील गावागावात,घराघरात भेसळयुक्त दूध ! एफडीए चे हाश्मी अन पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष !!
आष्टी – राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता म्हणवणारा सतीश शिंदे याच्या दुधभेसळ धंद्याचा पर्दाफाश झाला मात्र पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे.एकट्या आष्टी तालुक्यात गावागावात, घरोघरी दुधभेसळ चा धंदा फोफावल्याचे चित्र आहे,मात्र प्रशासन लक्ष्मीदर्शनचा लाभ घेवून गप्प आहे.मिक्सर आणि केमिकलच्या माध्यमातून हे भेसळयुक्त दूध तयार होत आहे.याची माहिती असूनदेखील अन्न व औषध […]
राणेंना सेना सोडायची नव्हती – राज ठाकरे !
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.बाळासाहेब ठाकरे यांचे शिवधनुष्य एकाला पेलवले नाही आता दुसऱ्याला पेलवेल की नाही हे दिसेलच अस म्हणत माहीम च्या खाडीत सुरू असलेले अवैध बांधकाम रोखा अन्यथा तेथे गणपती मंदिर उभारू असा इशारा ठाकरे यांनी दिला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी […]
पाडवा झाला तरी आनंदाचा शिधा पोहचलाच नाही !
बीड- गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा शिधा खाजगी वितरकांकडून खरेदी केला जात आहे. काही ठिकाणी जिल्ह्याच्या शासकीय गोदामांमध्ये शिधा दाखल झाला आहे. मात्र,बीड जिल्ह्यात शासकीय गोडाऊनमध्ये आतापर्यंत हा शिधा पोहचलेला नाही. अजून साखर, चणाडाळ आणि पामतेल आले […]
स्थानिक स्वराज्य संस्था बाबत पुढील आठवड्यात सुनावणी !
नवी दिल्ली- स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवावे या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात पुन्हा एकदा तारीख वाढली आहे.आता या प्रकरणाची सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी निवडणूक होणार की नाही याचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून तारीख पे तारीख पे […]
कर्मचाऱ्यांचा संप मिटला !
मुंबई गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेला शासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप मुख्यमंत्र्यांशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर मिटला आहे याबाबतची अधिकृत घोषणा संपकरी यांच्या नेत्यांनी मुंबईत केली. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील 18 लाख कर्मचारी 14 मार्चपासून संपावर गेले होते या संपाचा परिणाम शासकीय कामकाजासोबतच सामान्य लोकांच्या कामावर देखील […]
अनिल जयसिंघानी ला अटक !
मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल आणि खंडणी प्रकरणात मोठी अपडेट आली आहे.अनिक्षा जयसिंघानी च्या अटकेनंतर आता बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरात मधून अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली होती […]