बीड – पं.राजा काळे यांच्या बहारदार गाण्याने बीडकरांची दिवाळी पहाट सुरेल झाली.शास्त्रीय,उपशास्त्रीय आणि भक्तीसंगीताने त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.रसिक फाउंडेशनच्या वतीने या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह दिवाळीच्या पहाटे आयोजित करण्यात आलेली मैफिल छान रंगली.राग भैरव गाऊन पं. राजा काळे यांनी आपल्या प्रगल्भ आणि बहारदार गायनाचा प्रारंभ केला. त्यानंतर लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून […]