May 28, 2022

Tag: #गेवराई

आमदार उपोषणात अन प्रशासन वाळू माफियांच्या दारात !
टॅाप न्युज, माझे शहर

आमदार उपोषणात अन प्रशासन वाळू माफियांच्या दारात !

बीड- गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून वाळूचा बेसुमार उपसा चालू आहे.शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून सुरू असलेल्या वाळू उपशावर बंदी घालावी,महसूल अन पोलीस प्रशासनातील हप्तेखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी भाजपचे आ लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गेवराई तालुक्यातील ज्या वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत तेथून जेसीबी,पोकलेन,केन्या अन बोटीने वाळू उपसा सुरू […]

पुढे वाचा
खाडेंवारील गुन्हा मागे घ्या !महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन !
क्राईम, माझे शहर

खाडेंवारील गुन्हा मागे घ्या !महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन !

बीड – शासकीय कर्तव्य बजावत असताना गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा आणि संबंधित पोलीस ठाणे प्रमुखाला निलंबित करावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील महसूल अधिकारी अन कर्मचाऱ्यांनी सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे हे वाळू माफियांवर कारवाई करत असल्याच्या रागातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.शासकीय […]

पुढे वाचा
चार दिवसानंतर वाळू माफियांवर गुन्हा दाखल !!
क्राईम, माझे शहर

चार दिवसानंतर वाळू माफियांवर गुन्हा दाखल !!

बीड – वाळू साठी केलेल्या खड्यातील पाण्यात बुडून चार बालकांचा बळी गेल्यानंतर तब्बल चार दिवसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा चार वाळू माफियांवर दाखल झाला आहे.यावरून प्रशासन किती गेंड्याच्या कातडीचे आहे हे समोर आले आहे. गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्र असो की सिंदफना नदीचे पात्र ,वाळू माफियांनी सर्रास वाळू उपसा करून नदीची चाळणी केली आहे.वाळू उपसा करण्यासाठी जेसीबी,पोकलेन […]

पुढे वाचा
शर्मा जी भ्रष्ट नायब तहसीलदार जाधवर यांच्या निलंबनाला मुहूर्त कधी लागणार !
टॅाप न्युज, माझे शहर

शर्मा जी भ्रष्ट नायब तहसीलदार जाधवर यांच्या निलंबनाला मुहूर्त कधी लागणार !

बीड – गेवराई तहसील कार्यालयात विद्यमान तहसीलदार सचिन खाडे यांनी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवून दोन महिने उलटत आले तरीही त्यावर अद्याप जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे या अशा भ्रष्ट लोकांना पाठीशी घातले जात असेल तर कडक कारवाईच्या घोषणा म्हणजे बोलचाच भात अन बोलचीच कढी अशा तर होणार नाहीत ना […]

पुढे वाचा
वाळूच्या केणीचा दांडा लागून मजुराचा मृत्यू !
टॅाप न्युज, माझे शहर

वाळूच्या केणीचा दांडा लागून मजुराचा मृत्यू !

बीड – गेवराई तालुक्यातील गोदावरी पट्यात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे.या वाळूने गेल्या महिना दोन महिन्यात अनेकांचे जीव घेतलेत.मात्र त्याच्याशी तहसीलदार सचिन खाडे यांना काहीच देणंघेणं नाही.शुक्रवारी दुपारी राक्षसभुवन च्या नदीत वाळू उपसा करणाऱ्या केणीचा दांडा लागल्याने अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महसूल प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेण्यात अन नोटा मोजण्यात […]

पुढे वाचा
गेवराई नगर पालिकेच्या कारभाराची अतिरिक्त जिल्हाधिकारी करणार चौकशी !
क्राईम, माझे शहर, राजकारण

गेवराई नगर पालिकेच्या कारभाराची अतिरिक्त जिल्हाधिकारी करणार चौकशी !

बीड – स्वच्छ प्रतिमा अन प्रामाणिक कारभार असा दावा करणाऱ्या आ लक्ष्मण पवार यांच्या ताब्यातील गेवराई नगर परिषदेत देखील कोट्यवधी रुपये गुत्तेदारांच्या माध्यमातून स्वतःच्या अन कार्यकर्त्यांच्या घशात घालण्याचा प्रकार समोर आला आहे.माजी आ अमरसिंह पंडित यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी एक समिती गठीत केली आहे. भाजपा आ.लक्ष्मण पवार यांच्या ताब्यातील गेवराई नगर परिषदेचा भ्रष्ट […]

पुढे वाचा
टाकळगाव च्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये होणार रूपांतर !
टॅाप न्युज, माझे शहर

टाकळगाव च्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये होणार रूपांतर !

गेवराई – सिंदफणा नदीवरील टाकळगाव बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामास महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे तब्बल 250 हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन त्याचा पंधरा ते वीस गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे . या बॅरेजमुळे सुमारे २५० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कामाच्या सर्व्हेक्षण व अन्वेषणाचे काम तात्काळ सुरु […]

पुढे वाचा
पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू !
क्राईम, टॅाप न्युज

पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू !

बीड – दोन वेगवेगळ्या घटनेत तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बीड आणि गेवराई तालुक्यात घडली आहे .बिंदुसरा धरणावर दोन जणांचा तर सुरळेगाव येथे एक जण पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला आहे . ओंकार लक्ष्मण काळे (वय 16), शिव संतोष पिंगळे (वय 16, दोघेही रा. बीड) व तान्हाजी लिंबाजी आरबड (वय 17, रा. सुरळेगाव ता. […]

पुढे वाचा
पूल नसल्याने पुरात वाहून गेला तरुण ! ग्रामस्थांचा संताप !!
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

पूल नसल्याने पुरात वाहून गेला तरुण ! ग्रामस्थांचा संताप !!

गेवराई – नदीवरील पूल वाहून गेल्याने कठड्यावरून नदी पार करणाऱ्या संदीपान संत या 35 वर्षीय युवकाचा नदीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.यापूर्वी तीन दिवसांपूर्वी या गावातील एका मुलीने आत्महत्या केल्याने तिचा मृतदेह खांद्यावर उचलून नदी पार करावी लागली होती,विकासाचे दावे करणारे पंडित आणि पवार या दोन्ही राजकारण्याबद्दल लोकांत यामुळे चीड निर्माण झाली आहे . गेवराई तालुक्यातील […]

पुढे वाचा
माय लेकीसह तिघींचा बुडून मृत्यू !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

माय लेकीसह तिघींचा बुडून मृत्यू !

गेवराई – कपडे धुण्यासाठी गेलेल्या चौघी जणी नदीत बुडाल्या. यापैकी तिघींचा मृत्यू झाला आहे, तर एकीला वाचवण्यात यश आलं. बीड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये आई, मुलगी आणि पुतणीचा समावेश आहे. गेवराई तालुक्यातील मिरगाव इथं ही दुर्दैवी घटना घडली.  रंजना गोडबोले वय 30, शीतल गोडबोले वय 10 आणि अर्चना गोडबोले वय 10, यांचा मृतांत […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click