अहमदनगर – जिल्ह्यातील पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा होत असून भाजपचे आजी आ शिवाजी कर्डीले यांनी याबाबत तनपुरे यांच्या चौकशीची मागणी केली आहे,त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे . अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मधील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि […]
सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का !
नवी दिल्ली -राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि जयश्री पाटील यांच्या याचिकेविरोधात राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने सरकारला मोठा धक्का बसला आहे . अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. एक माजी गृहमंत्री […]
राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही -जावडेकर !
नवी दिल्ली – राज्यातील पोलीस दलात जे काही वसुली कांड सुरू आहे त्यात मंत्र्यांची नाव येत आहेत,गृहमंत्री बाजूला झाले आहेत तर आता आणखी दोन मंत्र्यांची नाव आली आहेत त्यामुळे या महावसुली सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशी टीका केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे . एन आय ए च्या ताब्यात असलेल्या निलंबित एपीआय सचिन […]
वाझे च्या लेटरबॉम्ब ने शरद पवार,अनिल देशमुख, अनिल परब यांच्यावर आरोप !
मुंबई – राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब मुळे गृहमंत्र्यांची विकेट जाऊन चोवीस तास उलटले तोच पुन्हा एका नव्या लेटरबॉम्ब ने खळबळ उडाली आहे .अंबानी स्फोटक प्रकरणी एन आय ए कोठडीत असलेले निलंबित एपीआय सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्या नावाने दोन कोटी मागितले तर परिवहनमंत्री अनिल परब […]
नागवी नैतिकता …………!
बीड / लक्ष्मीकांत रुईकर राज्याच्या गृहमंत्र्यावर त्यांच्याच खात्यातील एक उच्चपदस्थ अधिकारी कोट्यवधी रुपये वसुली च टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप करतो अन त्यानंतर दहा दिवसांनी हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आणि न्यायालयाने दखल घेतल्यानंतर नैतिकतेची आठवण होते अन गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतात,पुन्हा वर सांगितले जात की चौकशीमध्ये बाधा येऊ नये म्हणून आणि नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा […]
लेटरबॉम्ब प्रकरणात उच्च न्यायालयाच्या विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात !
नवी दिल्ली – माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात खुद्द राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे .मात्र याबाबत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे . मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या याचिकेत संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात […]
दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री !
मुंबई – परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब मुळे राजीनामा द्यावा लागलेल्या अनिल देशमुख यांच्याकडील गृहमंत्री पदाचा पदभार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला असून पाटील यांच्याकडील कामगार खाते हसन मुश्रीफ यांना तर उत्पादन शुल्क खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे . राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या वसुलीच्या आरोपाबाबत जयश्री पाटील यांच्या […]
लेटरबॉम्ब फुटला,अनिल देशमुख यांचा राजीनामा !
मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्ब नंतर हाय कोर्टात गेलेल्या परमवीर सिंग आणि जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली . मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी […]
गृहमंत्री देशमुख यांनी सीबीआय करणार चौकशी !
मुंबई – मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 31 मार्चला युक्तिवाद झाला. परमबीर सिंग यांच्यावतीनं वकील विक्रम ननकानी यांनी बाजू मांडली. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात […]
राऊत यांच्या रोखठोक ला अजित दादांचे कडक उत्तर !
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक मुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले असून महाविकास आघाडीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याच काम करू नये,अशी वक्तव्य टाळली पाहिजेत अशा शब्दात पवार यांनी राऊत यांचे कान टोचले आहेत . महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये,’ अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]