बीड – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणणे तसेच बाधित रुग्णांना उपचार मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने बैठकांचे सत्र घेऊन त्यांना आवश्यक बाबींचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याचे फलित जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने जिल्ह्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा आता नियमित होऊ लागला आहे. तसेच काल जिल्ह्याला कोव्हीशिल्ड […]
जिल्ह्यात बुधवारी पुन्हा 1439 पॉझिटिव्ह !
बीड – बीड जिल्ह्यातील पाचपेक्षा अधिक तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यात पुन्हा एकदा 1439 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .बीड जिल्ह्यात बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस कडक लॉक डाऊन लावण्यात आल्याने रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होईल का याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे . बीड जिल्ह्यात […]
पालकमंत्री मुंडेंच्या अचानक भेटीने यंत्रणा टाईट !
अंबाजोगाई – रविवारी रात्री बीड जिल्हाधिकारी अचानक भेट दिल्यानंतर आज (सोमवार) दुपारी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे आज अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून त्यांनी दाखल असलेली एकूण रुग्णसंख्या, उपलब्ध व शिल्लक बेड, रेमडीसीविर इंजेक्शनची वितरण प्रक्रिया, ऑक्सिजन पुरवठा या सर्वच बाबींचा बारकाईने आढावा घेतला.तसेच […]
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कोविड सेंटर जनसेवेत !
परळी – गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड रूग्णांसाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटर व घरपोंच मोफत भोजन व्यवस्थेचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने करण्यात आला. या सेंटरमध्ये आजपासून रूग्णसेवेला प्रारंभ झाला आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून […]
बीड जिल्ह्यात 1256 पॉझिटिव्ह तर 2489 निगेटिव्ह !
बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी देखील बाराशे पार गेल्याचे दिसून आले .3775 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 2489 निगेटिव्ह आले असून बीड सह पाच तालुक्यातील आकडेवारी शंभर अन दोनशे पार गेली आहे . बीड जिल्ह्यात अंबाजोगाई 237,बीड 279,आष्टी 101,पाटोदा 65,परळी 122,शिरूर 47,केज 143,गेवराई 55,माजलगाव 88,वडवणी 55,धारूर 64 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत . जिल्ह्यातील […]
कोलकाता विरुद्ध बंगलोर ची मॅच रद्द !
दिल्ली – आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना […]
जिल्ह्यात 1512 पॉझिटिव्ह !
बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी 1512 पर्यंत पोहचला .जिल्ह्यातील पाच तालुक्यातील परिस्थिती हाताबाहेर चालली असून स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कडक लॉक डाऊन लागू करा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत . बीड जिल्ह्यात अंबाजोगाई 271,बीड 277,परळी 141,केज 116,माजलगाव 32,आष्टी 180,पाटोदा 67,शिरूर 99,धारूर 67,वडवणी 42,गेवराई 120 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बाहेरून बंद आतून सगळं सुरू !मिळमिळीत लॉक डाऊन नको,कडक कारवाई करा – धनंजय मुंडे !!
बीड – कोरोना वाढत असताना बाहेरून शटर बंद अन आत सगळं चालू अशी स्थिती आहे,असलं मिळमिळीत लॉक डाऊन काही कामाच नाही अस म्हणत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष घालून कडक लॉक डाऊन ची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले .जोपर्यंत लोक घरात बसणार नाहीत तोपर्यंत कोरोना आटोक्यात येणार नाही,त्यामुळे लोकांनी सहकार्य करण्याचे […]
जिल्ह्यातील आकडा पुन्हा 1300 पार !
बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा 1346 पर्यंत गेला असून बीडचे त्रिशतक कायम आहे,बीड,अंबाजोगाई, परळी,गेवराई, केज आष्टी या तालुक्यात भीषण परिस्थिती असून रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे . जिल्ह्यातील अंबाजोगाई 260,बीड 348,आष्टी 54,पाटोदा 67 ,शिरूर 89,धारूर 72,वडवणी 57,गेवराई 131,माजलगाव 58,केज 145 परळी 75 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . […]
महाराष्ट्र दिनापासून मोफत लस !
मुंबई – राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले यावेळी […]