News & View

ताज्या घडामोडी

Tag: #एसपी बीड

  • वाळू माफियांची तहसीलदारांवर दगडफेक ! एक जण जखमी !!

    बीड-अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांच्या पथकावर गेवराई तालुक्यातील वाळू माफियांनी दगडफेक केली. यामध्ये तहसीलदार यांच्या सोबत असलेला एक कर्मचारी जखमी झाला. पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील गोदावरी नदीत गेल्या काही दिवसापासून रात्री व दिवसा ढवळ्या मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूची तस्करी सुरू आहे. याची माहिती मिळाल्यानंतर नवीन रुजू झालेले तहसीलदार सारंग चव्हाण हे स्वतः बुधवारी…

  • विरोधीपक्ष नेतेपद नको!अजित पवारांच्या गुगलीने दिग्गज बोल्ड!!

    मुंबई- राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोरच मनातील खदखद बोलून दाखवली.मी जक्या वर्षभरात सरकारवर कडाडून हल्ला केला नाही अस काहीजण म्हणतात.आता काय त्यांची गचंडी धरू का अस म्हणत आपल्याला या पदाच्या जबाबदारी मधून मुक्त करा अस अजित पवार म्हणाले. मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी…

  • रिपाईचा सरकारला ईशारा !

    बीड- राज्यभर सरकारकडून सुरु असलेली गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहीम तातडीने थांबवली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला.पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांसाठी रिपाईच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी सरकारच्या धोरणावर टीका…

  • जयभवानी च्या चेअरमन पदी अमरसिंह पंडित !

    गेवराई – जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अमरसिंह पंडित यांची तर व्हाईस चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर चेअरमन अमरसिंह पंडित आणि व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सभासदांनी टकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी नव्या जोमाने आणि तयारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत साखरेच्या उत्पादना बरोबर इथेनॉल सारख्या उपपदार्थाचे…

  • दहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला अटक !

    बीड- अदखलपात्र गुन्हा तातडीने निकाली काढण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना वडवणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रेवणनाथ गंगावणे यास पथकाने रंगेहाथ पकडले. शेजाऱ्यासोबत असलेल्या जमिनीच्या वादातून वडवणी पोलिसात काही दिवसांपूर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात वारंवार पोलिसांकडून त्रास दिला जात होता.तसेच पैशाची देखील मागणी केली जात होती. तब्बल पन्नास हजार रुपये या प्रकरणी नाव काढण्यासाठी…

  • रिक्षाने तुमची मर्सिडीज खड्यात घातली- मुख्यमंत्री शिंदे !

    मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. या रिक्षाने तुमच्या मर्सिडीज ला खड्यात घातलं,मी दोन दिवस गावाला गेलो तर मुख्यमंत्री गावाला गेले म्हणून चर्चा केली,तुम्ही तर असूच वर्षात दोनदाच मंत्रालयात आलात,आमच्या वर आरोप करण्या अगोदर तुम्ही काय वागलात हे बघा.येणाऱ्या काळात खोके कोणाला भेटत होते हे सगळं बाहेर…

  • वैद्यनाथ च्या चेअरमन पदी पंकजा मुंडे !

    परळी- येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी माजीमंत्री पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्ष पदी चंद्रकांत कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात दिलजमाई झाली असल्याचे पाहायला मिळाले होते. भाजप नेते स्व गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार…

  • मोदी तामिळनाडू मधून निवडणूक लढणार !

    नवी दिल्ली- आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपने सुरवात केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी सोबतच तामिळनाडू मधील रामनाथपुरम येथूनही निवडणूक लढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. रामेश्वरम या तिर्थक्षेत्राच्या सानिध्यात दक्षिणेकडे लक्ष देण्याची भाजपची योजना असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदी हे पुढील वर्षी लोकसभा निवडणूक दक्षिणेकडील राज्यातून, प्राधान्याने तामिळनाडूमधून लढवण्याचा गंभीरपणे विचार…

  • रट्टा बसताच नगर पालिकेने केले कर्ज निल !

    बीड- येथील नगर परिषदचे नाट्यगृह बांधकामासाठी बीड च्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकने रु.एक कोटी फक्त कर्ज सन २००६ मध्ये दिले होते. खाते एन पी ए होऊन देखील कर्ज बाकी न भरल्यामुळे बँकेने कर्जासाठी तारण दिलेल्या नाट्यगृह मालमत्तेचा सांकेतिक ताबा सरफेसी-२००२ या कायद्यातर्गत दि.१६/०६/२०२३ रोजी घेतला होता. सदर कार्यवाहीमुळे मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे मॅडम यांनी…

  • जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थी आधार विना !

    बीड- बीड जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही सरळ पोर्टलवर जोडले गेलेले नाहीत.पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले आहेत मात्र ज्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाहीत त्या शाळांना दोन दिवसात अपडेट बाबत सूचित करावे अन्यथा त्या शाळांचे यु डायस नंबर रद्द करण्यात येतील असा इशारा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे….