मुंबई – राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर अखेर तोडगा निघाला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात विलीनीकरण वगळता इतर मागण्या मान्य झाल्या आहेत.त्यामुळे एसटी चा संप मिटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा अखेर सुटला आहे. 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. विलीनकरणाची मागणी […]
एसटी चे विलीनीकरण अशक्य !
मुंबई – एस टी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण अशक्य असल्याचे सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहात मांडला.यामुळे गेल्या चार महिन्यापासून संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता हे कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण शक्य नाही, असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून […]
एसटी संपाला व्यापाऱ्यांचा पाठिंबा ! आंदोलकांना दिले जेवण !!
बीड – बीड आगारात मागील नऊ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. आणि याच कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी, म्हणून बीड व्यापारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. कॅट या आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष व वैष्णो देवी मंदिर संस्थान बीड चे संस्थापक अध्यक्ष संतोष सोहनी व कॅट व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे व व्यापारी महासंघाच्या […]
संप चिघळला ! वाहकाने घेतले विष !
बीड- एस टी महामंडळाच्या वाहक आणि चालकांचा संप चिघळला आहे.बीड येथे संपकरी वाहकाने रोगर घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून राज्यभर संप सुरू आहे.ऐन दिवाळीच्या काळात हा संप सुरू असल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली […]
लॉक डाऊन नाहीच !नवे नियम सरकारी कार्यालये अन वाहतुकीसाठी बंधनकारक !!
मुंबई – राज्यातील कोरोना रोखण्यासाठी आज रात्रीपासून लॉक डाऊन लागण्याची शक्यता होती मात्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशामुळे लॉक डाऊन होणार नसून निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत .सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थितीत काम करावे लागणार असून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत . मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंगळवारी लॉक डाऊन होण्याची […]
उद्या सरकारी वाहतूक,एस टी सुरू राहणार !
बीड – एप्रिल महिन्यात सर्वच विकेंड ला संपूर्ण संचारबंदी असल्याने एसटी वाहतूक सुरू राहणार की नाही याबाबत शंका होती मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकेंड ला देखील सरकारी वाहतूक अर्थात एसटी च्या फेऱ्या सुरू राहणार आहेत,मात्र प्रवाशी नसल्यास ही वाहतूक सुरू ठेवून सरकार अन महामंडळ काय साध्य करणार आहे हा प्रश्नच आहे . राज्यातील वाढत्या कोरोना […]