बीड – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणणे तसेच बाधित रुग्णांना उपचार मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत सातत्याने बैठकांचे सत्र घेऊन त्यांना आवश्यक बाबींचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याचे फलित जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने जिल्ह्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा आता नियमित होऊ लागला आहे. तसेच काल जिल्ह्याला कोव्हीशिल्ड […]
जिल्ह्यात बुधवारी पुन्हा 1439 पॉझिटिव्ह !
बीड – बीड जिल्ह्यातील पाचपेक्षा अधिक तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यात पुन्हा एकदा 1439 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .बीड जिल्ह्यात बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस कडक लॉक डाऊन लावण्यात आल्याने रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होईल का याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे . बीड जिल्ह्यात […]
विनामास्क राहणाऱ्या एस पी ना कोण दंड करणार !
बीड – ज्यांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम आहे तेच जर कायदे अन नियम पाळणार नसतील तर लोकांनी कोणाचा आदर्श घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे .रस्त्यावर विनामास्क ,विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर एकीकडे पोलीस कारवाई करत असताना सार्वजनिक कार्यक्रमात विनामास्क असणाऱ्या एस पी राजा रामस्वामी यांच्यावर कोण कारवाई करणार अशी चर्चा होऊ लागली आहे […]
पालकमंत्री मुंडेंच्या अचानक भेटीने यंत्रणा टाईट !
अंबाजोगाई – रविवारी रात्री बीड जिल्हाधिकारी अचानक भेट दिल्यानंतर आज (सोमवार) दुपारी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे आज अचानक भेट दिली. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून त्यांनी दाखल असलेली एकूण रुग्णसंख्या, उपलब्ध व शिल्लक बेड, रेमडीसीविर इंजेक्शनची वितरण प्रक्रिया, ऑक्सिजन पुरवठा या सर्वच बाबींचा बारकाईने आढावा घेतला.तसेच […]
बीड जिल्ह्यात 1256 पॉझिटिव्ह तर 2489 निगेटिव्ह !
बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी देखील बाराशे पार गेल्याचे दिसून आले .3775 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 2489 निगेटिव्ह आले असून बीड सह पाच तालुक्यातील आकडेवारी शंभर अन दोनशे पार गेली आहे . बीड जिल्ह्यात अंबाजोगाई 237,बीड 279,आष्टी 101,पाटोदा 65,परळी 122,शिरूर 47,केज 143,गेवराई 55,माजलगाव 88,वडवणी 55,धारूर 64 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत . जिल्ह्यातील […]
जिल्ह्यात 1512 पॉझिटिव्ह !
बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी 1512 पर्यंत पोहचला .जिल्ह्यातील पाच तालुक्यातील परिस्थिती हाताबाहेर चालली असून स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कडक लॉक डाऊन लागू करा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत . बीड जिल्ह्यात अंबाजोगाई 271,बीड 277,परळी 141,केज 116,माजलगाव 32,आष्टी 180,पाटोदा 67,शिरूर 99,धारूर 67,वडवणी 42,गेवराई 120 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
कोरोना दीड हजाराच्या समीप !सहा तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग मोठा !
बीड – अंबाजोगाई, केज,बीड,गेवराई, आष्टी आणि परळी या तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे .या तालुक्यात लॉक डाऊन चा धुव्वा उडाला आहे की प्रशासन झोपले आहे अशी शंका रुग्णसंख्येवरून येत आहे .जिल्ह्यातील पॉझिटिव्ह चा आकडा गुरुवारी 1470 वर गेला,या वर्षातील हा सगळ्यात मोठा आकडा आहे . बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा धक्क्यादायक पध्दतीने […]
जिल्ह्यातील आकडा पुन्हा 1300 पार !
बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा 1346 पर्यंत गेला असून बीडचे त्रिशतक कायम आहे,बीड,अंबाजोगाई, परळी,गेवराई, केज आष्टी या तालुक्यात भीषण परिस्थिती असून रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे . जिल्ह्यातील अंबाजोगाई 260,बीड 348,आष्टी 54,पाटोदा 67 ,शिरूर 89,धारूर 72,वडवणी 57,गेवराई 131,माजलगाव 58,केज 145 परळी 75 इतके रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . […]
महाराष्ट्र दिनापासून मोफत लस !
मुंबई – राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले यावेळी […]
बीडला आरटीपीसीआर लॅब मंजूर !
बीड (दि. 27) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, बीड विधानसभा मतदारसंघाचे आ. संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून, ना. मुंडे यांनी जिल्ह्याच्या कोविड आढावा बैठकीत शब्द दिल्याप्रमाणे बीड जिल्हा रुग्णालयात कोविड-19 विषाणू चाचणी (आर टी पी सी आर) साठीची व्ही आर डी एल लॅब मंजूर करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय […]