News & View

ताज्या घडामोडी

Tag: #अमित शहा

  • कुस्तीपटूच्या आंदोलनाबाबत खा.प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल !

    बीड- दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटुच्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यायला हवी अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत कोणीही उमेदवार समोर असला तरी आपलं काम ,लोकांशी असलेला संपर्क यामुळे आपल्याला अडचण येणार नाही अस सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला . बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.देशभर…

  • सेंगोल म्हणजे काय ? नव्या सभागृहात होणार स्थापना !!

    नवी दिल्ली- भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी लॉर्ड माउंट बॅटन यांच्याकडून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जो सेंगोल स्वीकारून शपथ घेतली आज 75वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या सभागृहात सेंगोल ची स्थापना केली जाईल आणि सभागृहाचे शानदार उद्घाटन थाटात संपन्न होईल. या सेंगोल चा इतिहास मोठा रंजक आहे. ब्रिटिशांच्या…

  • खासदारांची संख्या वाढणार !नव्या संसद भवनाची ही आहेत वैशिष्ट्ये !!

    नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वा विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उदघाटन होणाऱ्या नव्या संसद भवनात तब्बल1400 खासदार बसू शकतील एवढी आसनक्षमता तयार केली आहे.त्यामुळे लवकरच लोकसभा सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील.लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील…

  • आधार लिंक नसल्याने 32 लाख शेतकरी अनुदानापासून वंचित !

    बीड- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आधार लिंक नसणे व इतर गोष्टींमुळे राज्यभरातील तब्बल 32 लाख शेतकरी यावेळच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. केंद्राच्या निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील ३२ लाख ३७ हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्याच हप्त्याला मुकणार असल्याची सद्य:स्थिती आहे. अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान…

  • पुन्हा नोटबंदी,कारण अस्पष्ट !!

     नवी दिल्ली- तब्बल सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नोटबंदीचा नेमका हेतू काय अन दोन हजाराची नोट का चलनात आणली ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.अशातच येत्या सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे.नागरिकांनी तोपर्यंत आपल्याकडील नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन आरबीआय ने केले आहे. 23 मे 2023 पासून…

  • मोदींचा रिजिजू यांना धक्का ! कायदामंत्री पद काढले !!

    नवी दिल्ली- देशाचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडील खात्याचा कारभार अचानकपणे काढून घेण्यात आला आहे.आता अर्जुन मेघवाल नवे कायदामंत्री असतील.गेल्या काही महिन्यांपासून न्यायाधीश आणि रिजिजू यांच्यातील वादामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  मोदी सरकारने कायदा मंत्री किरन रिजिजू यांच्या खात्यात बदल केला आहे….

  • फुकटच्या आश्वासनावर खर्च होणार 62 हजार कोटी !

    कर्नाटक- भाजपला धक्का देत काँग्रेसने कर्नाटक मध्ये सत्ता ताब्यात घेतली.या विजयाचे श्रेय नेत्यांच्या मेहनतीला जसे आहे तसेच फुकटच्या आश्वासनाला देखील आहे.कारण काँग्रेसने फुकट वीज,महिलांना 2 हजार भत्ता आणि बेरोजगार युवकांना 3 हजार रुपये भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे.हे सगळं पूर्ण करायचं म्हटल्यास वर्षाकाठी 62 हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीवर ताण पडणार आहे. कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान…

  • कर्नाटकात काँग्रेसने मैदान मारले !

    नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने मैदान मारले आहे.दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने 132 जागांवर आघाडी घेत 60 जागेवर विजय मिळवला आहे.तर सत्ताधारी भाजपने 64 जागांवर आघाडी घेत 21 जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान काँग्रेस ११८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७३ जागांवर पुढे आहे. तसेच काँग्रेसच्या सर्व…

  • आधी पक्षाबाबत निर्णय नंतर अपात्रतेबाबतचा – नार्वेकर !

    मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याची कारवाई करण्याचे अधिकार मला दिले आहेत,त्यामुळे सर्व बाजू तपासून पाहून,तपासणी,उलट तपासणी करून मगच निर्णय घेण्यात येईल.राजकीय पक्ष कोणाचा याचा निर्णय आधी होईल मग अपात्रतेबाबतचा होईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर नार्वेकर मीडियाशी बोलत होते.ते म्हणाले की,सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो….

  • सर्वोच्च न्यायालयाची उद्धव ठाकरे यांना चपराक – मुख्यमंत्री शिंदे !

    मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे चपराक बसली आहे,आम्ही धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवली अस म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आजचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल लागल्याबद्दल मी आमच्या सगळ्यांना शुभेच्छा मलाही दिल्या पण तुम्हाला देतो शुभेच्छा…