अंबाजोगाई – राज्यात दोघांचेच सरकार आहे,ना मंत्री,ना पालकमंत्री, त्यामुळे सर्वसामान्य माणूस अन शेतकरी हैराण झाला आहे.अतिवृष्टीमुळे पिकाचे,जनावरांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुसत्या दिल्लीवाऱ्या करण्यापेक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत असा सल्ला राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिला. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी या भागात थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पवार यांनी शेतीच्या […]
अतिवृष्टीमुळे मराठवड्यात मोठे नुकसान !
बीड- मराठवाड्यात गेल्या दहा बारा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड,जालना वगळता बहुतांश भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः नांदेड,परभणी,हिंगोली या जिल्ह्यात शेतीपिकासह जीवित आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे. जुलै महिन्यात पावसाने मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यातील १८२ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हे सोडले तर विभागातील […]
जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा ! बहुतांश प्रकल्प जोत्याखाली !!
बीड- पावसाळा सुरू होऊन तब्बल दिड महिना उलटला तरीदेखील बीड जिल्ह्यात म्हणावा तसा समाधानकारक पाऊस झालेला नाही.दिवसभर आभाळ भरून येत मात्र भुरभुर पाऊस येत असल्याने जिल्ह्यातील तब्बल 144 तलाव अद्यापही कोरडेच आहेत.त्यामुळे पिकाचा प्रश्न मिटला असला तरी पिण्याच्या पाण्याची मात्र अद्याप सोय झालेली नाही हे निश्चित. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 144 लहान-मोठे प्रकल्प आहेत. मात्र, प्रत्येक […]
अतिवृष्टी च्या नुकसान भरपाई पोटी जिल्ह्याला मिळणार 142 कोटी !
बीड – महाराष्ट्रातील बहुतांश भागात जून ते सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानभरपाई पोटी राज्य शासनाने वाढीव दराने उर्वरित मदत वितरित करण्याचा शासन आदेश महसूल व वन विभागाच्या वतीने जारी केला असून, याव्दारे राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 1035 कोटी 14 लाख रुपये वितरित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी मराठवाड्यात सर्वाधिक मदत बीड […]
मतदारसंघात आ क्षीरसागर यांच्या सूचनेवरून मदतीचे वाटप सुरू !
बीड- गेल्या दीड महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड मतदारसंघात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते,याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर 94 कोटी रुपये मदत प्राप्त झाली असून दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या आ संदिप क्षीरसागर यांच्या सूचना तहसील प्रशासनाने मनावर घेतल्या आहेत.त्यानुसार शनिवारी मदत खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे . […]
जिल्ह्यातील बाधित तालुक्यांना पाचशे कोटी वाटप !
बीड – राज्य शासनाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने 2860 कोटी रुपयांची प्राथमिक मदत काल अध्यादेश जारी करून महसुली यंत्रणेमार्फत वितरित करण्याचे घोषित केले होते. त्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी यानुषंगाने यंत्रणांना तातडीने कामाला लावले; बीड जिल्हा प्रशासनाने 24 तासांच्या […]
पालकमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या घरी !
परळी -परळी तालुक्यातील टोकवाडी, देशमुख टाकळी तडोळी येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेऊन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धनंजय मुंडे यांनी ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर पांगरी येथील पुरात होऊन मयत झालेल्या ज्ञानोबा […]
आधी पंचनामे मगच मदत !
बीड – मराठवाड्यासह ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला त्यांना हेक्टरी दहा हजाराची मिळणारी मदत देताना राज्य शासनाने खुट्टी मारली आहे.पंचनामे झाल्याशिवाय मदत देऊ नये असा आदेश शासनाने काढल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे . बीड जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले.लाखो हेक्टर जमीन खरडून […]
फक्त दोन हेक्टर ची भरपाई मिळणार !
मुंबई – मराठवाडा आणि इतर भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटी राज्य सरकारने दहा हजार कोटींचे पॅकेज घोषित केले असून एका शेतकऱ्याला केवळ दोन हेक्टर प्रमाणे नुकसानभरपाई मिळणार आहे .सरकारच्या या निर्णयानंतर विरोधकांनी टीका केली आहे . अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक […]
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदतीसाठी प्रयत्न – धनंजय मुंडे !
बीड-जिल्ह्यात मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये पुराचे अभूतपूर्व संकट उभे राहिले. यातून बाहेर येण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.पिक विमा च्या भरपाई बरोबरच राज्य आपत्ती निवारण निधी च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील जवळपास अतिवृष्टीची झळ बसलेले सर्व शेतकरी पात्र ठरत असून ही मदत राज्य शासनाने घोषित केल्यानंतर सर्व शेतकर्यांना मिळू शकणार आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष […]