विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर कोणतीही दुर्घटना घडली की प्रशासन तातडीने जागे झाल्यासारखे करते,मंत्री संत्री,जिल्हाधिकारी, तहसीलदार पासून सगळे झाडून पुसून भेटी देतात.राजकीय पक्षाचे पदाधिकारी पर्यटन केल्याप्रमाणे भेटीगाठी देऊन सांत्वन करतात अन पुन्हा नव्या दुर्घटनेपर्यंत हातावर हात धरून बसतात.हे चित्र गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे दिसते.हा मानवी स्वभावातील दोष म्हणायचा की पाट्या टाकण्याची सरकारी मनोवृत्ती म्हणायची . […]
शेतकऱ्यांनी संयम बाळगावा-धनंजय मुंडे !
मुंबई-केवळ बीड, परभणी नव्हे ते यावर्षी सबंध महाराष्ट्रात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांच्या अतिरिक्त ऊसाचे गाळप होईपर्यंत बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातील कारखाने सुरू ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने साखर कारखान्यांना दिलेले आहेत. अतिरिक्त उसाच्या प्रश्नामुळे परिस्थिती गंभीर असली तरी राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असे आवाहन करतानाच अगदी […]
मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास ठरतोय !
बीड- बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात जवळपास 24 लाख मेट्रिक टन ऊस अजूनही शेतात उभा आहे.बारा चौदा महिने झाले तरी तोड होत नसल्याने उसाला पांढरे तुरे आले आहेत.लाख मोलाचं पीक डोळ्यादेखत वाळून जात असल्याने शेतकरी हताश झाला आहे.राज्य सरकारने याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी मे अखेर पर्यंत कारखाने सुरू राहील तरी संपूर्ण उसाचे […]