News & View

ताज्या घडामोडी

Tag: #अजित पवार

  • जालना महापालिकेला शासनाची मंजुरी !

    जालना- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा रावसाहेब दानवे,माजीमंत्री अर्जुन खोतकर,माजीमंत्री राजेश टोपे यांचं होम टाऊन असलेल्या जालना नगर परिषद ला महापालिकेत रूपांतरित करण्याचा ठराव राज्य शासनाने पारित केला आहे.त्यामुळे आता राज्यात 29 महापालिका झाल्या आहेत.महापालिका झाल्याने जालनेकरांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत….

  • आरटीई प्रवेश नाकारल्यास फौजदारी कारवाई चा इशारा !

    बीड- आर टी प्रवेशापोटी शासनाकडे थकलेले अनुदान आणि त्यामुळे यावर्षी आरटीई च्या प्रवेशास नकार देण्याची शाळांची कृती नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे त्यामुळे अशा शाळांचा यु-डायस नंबर मान्यता रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिला आहे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात मेस्टा संघटनेच्या वतीने मोफत आरटीई प्रवेश…

  • पवारांचा यु टर्न !

    मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले.मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. वाय बी चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली दोन मे रोजी आपण पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच…

  • जयदत्त क्षीरसागरांचं काय अन कुठं चुकलं !

    बाजार समितीच्या निवडणुकीत झालेला पराभव हा जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का आहे.नेमकं कुठं गणित चुकलं अन भविष्यात काय करायला हवं,पहा न्यूज अँड व्युज चा स्पेशल रिपोर्ट ! https://youtu.be/HXfFIoqfWDE

  • शरद पवारांचा राजीनामा !

    मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा राजीनामा का दिला,नेमकी त्यांची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी ही घोषणा केली.पवार यांनी या कार्यक्रमात त्यांचा आजवरचा राजकिय प्रवास…

  • राज्याच्या राजकारणात काहीतरी घडतंय !शहा,शिंदे,फडणवीस यांची गुप्त बैठक !!

    मुंबई- राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरतेचे ढग जमा झाले आहेत.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे कायम राहतील असंही बोललं जातंय,या अशा वातावरणात देशाचे गृहमंत्री अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते.त्यांनी आ पराग आळवणी यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तब्बल एक तास गुप्त…

  • राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होणार,अजित पवारांवर मोठी जबाबदारी !!

    मुंबई- राज्यातील अस्थिर राजकीय वातावरण पाहता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. नव्या समिकरणामध्ये मोठा वाटा अजित पवार यांच्या पदरात पडण्याची देखील शक्यता आहे. या दृष्टीने मुंबईत राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे. तब्बल नऊ महिन्यांपूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड झाले.शिंदेसह शिवसेनेचे तब्बल 40 आणि…