दुबई – एशिया चषकाच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला.विराट कोहली,रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांच्या फटकेबाजीपुढे पाक गोलंदाज फिके पडले.
भारत आणि पाकिस्तान चा सामना म्हणजे क्रीडा रसिकांसाठी मोठी पर्वणी.एशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भुवनेश्वर कुमार याने चार विकेट घेत पाकिस्तानला 147 धवावर रोखले.
हे टार्गेट घेऊन उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात नसिमने धक्का दिला.मात्र त्यानंतर विराट कोहली ने एक बाजू सांभाळत 35 धाव ठोकल्या.एका पाठोपाठ विकेट गेल्याने भारतीय संघ अडचणीत आला. मात्र रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचून आणला
शेवटच्या बारा चेंडूत भारताला 27 धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने 19 व्या शतकात तीन चौकार ठोकत सामना भारताच्या बाजूने पूर्णपणे फिरवला शेवटच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर पांड्याने षटकार ठोकत भारताला पाकिस्तान विरुद्ध मोठा विजय मिळवून दिला