सिंगापूर- सिंगापूर ओपनच्या स्पर्धेतून भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले आहे.यावेळी तिने विरोधी चिनी संघाची खेळाडू झी ई वांग हिचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
सिंगापूर ओपन २०२२ ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. रविवारी (१७ जुलै) झालेल्या या स्पर्धेतील बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चिनी संघाची खेळाडू झी ई वांग हिचा पराभव करत पीव्ही सिंधू (PV Sindhu) हीने आपल्या कारकिर्दीतील पहिले सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.
दोन वेळेची या ऑलम्पिक विजेती असलेली पीव्ही सिंधू सिंधूचे हे या हंगामातील तिसरे विजेतेपद ठरले आहे. याआधी तिने दोन सुपर ३००च्या स्पर्धा जिंकल्या आहेत. सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्वित्झर्लंडच्या योनक्स स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० टायटल जिंकली आहेत.