मुंबई – भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने भारताची दाणादाण उडवत सामना एकहाती जिंकला. यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींची प्रचंडच निराशा झाली आहे. माजी खेळाडू विनोद कांबळीसुद्धा याला अपवाद नाही.अनफिट असलेल्या हार्दिक ला त्याने हार्दिक पांड्या जा खेल दांड्या अस म्हणत टोला लगावला आहे .
विनोद कांबळी यांनी कू वर एका व्हीडिओद्वारे आपल्या भावना मांडल्या आहेत. यात अतिशय भावनिक होऊन बोलताना ते म्हणतात, “कालच्या पराभवानंतर मी अतिशय दु:खी आहे. काल भारताला पाकिस्तानने अतिशय सहजपणे हरवले. एकदम ‘ओम फट्ट स्वाहा’ अशी भारताची अवस्था झाली. माझ्या मनात खूप सारे प्रश्न उभे राहिले आहेत. काल काय झाले? नेमकी चूक कुठे झाली? यात मुख्य गुन्हेगार कोण आहे? आपण एक विकेट घेऊ शकलो नाही, ना एक बॉल परतवू शकलो. काय आहे हे सगळं?’
हार्दिक पांड्या याच्यावर तर कांबळीने विशेष राग व्यक्त केला. तो म्हणाला, हार्दिक तू दुखापत झालेली असतानाही खेळतो आहेस. मी तुला इतकेच सांगेन, फिटनेस मिळव. हार्दिक पांड्या, जाके खेल दांडिया!’