बीड- बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते अँड कंपनीने सुभाष सोनवणे या दिव्यांग उमेदवारास दिलेली नियमबाह्य नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे.
2014 साली सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून आरोग्य सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली.परीक्षा झाल्यानंतर या पदासाठी जे उमेदवार पत्र ठरले त्यांची प्रतीक्षा यादी आरोग्य विभागाने लावली.मात्र नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं.त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून ही प्रक्रिया थंड होती.
बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी म्हणून पदभार घेताच डॉ अमोल गित्ते यांनी ही जुनी प्रकिया सुरू केली.सुभाष सोनवणे या दिव्यांग कोट्यातील तीन क्रमांकाच्या उमेदवाराला थेट नियुक्तीच देऊन टाकली.जिल्हा निवड समिती असो की मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार या सर्वांना अंधारात ठेवून डॉ गित्ते अँड कंपनीने प्रक्रिया पूर्ण केली.
या सगळ्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेण्यात आला.पवार हे आपल्या टेबलवर एकही फाईल ठेवत नाहीत आणि एच ओ डी ने पाठवलेल्या फाईलचा तात्काळ निपटारा करतात.त्यामुळे डॉ गित्ते यांनी ही नियमबाह्य भरती प्रकिया पूर्णकरून घेतली.मात्र आता हे प्रकरण न्यूज अँड व्युजने उघडकीस आणल्यानंतर मुकाअ देखील अडचणीत आले आहेत.
दरम्यान आरोग्य अधिकारी डॉ गित्ते यांनी जो नियमबाह्य कारभार केला आहे त्याप्रकरणात बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार केली आहे.आरोग्य विभागातील या भरती घोटाळ्याची चौकशी करून डॉ गित्ते यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आ क्षीरसागर यांनी केली आहे.