October 5, 2022

गर्भपात प्रकरणात तपास कासवगतीने !

गर्भपात प्रकरणात तपास कासवगतीने !

बीड- तीन मुलीच्या पाठीवर चौथी मुलगीच होणार असल्याने गर्भपात करताना मृत्यू झालेल्या महिलेच्या प्रकरणात पोलीस तपास कासवगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.आरोपी मनीषा सानप सह मयत सीमा डोंगरे यांचे कॉलरेकॉर्ड तपासणे असो की सानप च्या घरात सापडलेल्या इतर रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शन असो याचा तपास करण्याऐवजी पोलीस नेमकं काय करत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीड जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी बंद झालेले गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाल्याचे मागील आठवड्यातील घटनेवरून समोर आले.शीतल गाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी पुढाकार घेत यंत्रणा कामाला लावली.

गर्भलिंग निदान करणारी अंगणवाडी सेविका मनीषा सानप हिच्या घराची झडती घेऊन कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली.मयत महिलेचा ओटी,सासरा आणि भावावर गुन्हा दाखल झाला.घरी गर्भपात करणाऱ्या सीमा डोंगरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.मात्र पोलिसांनी स्वतःच अंगणवाडी सेविका सानप हिची न्यायालयीन कोठडी मागितली आणि तपासाबाबत शंका निर्माण झाली.

सानप हिच्या घरातून पोलिसांना दोन तीन प्रिस्क्रिप्शन सापडले.त्यावरून संबंधित लोकांना चौकशीसाठी बोलावले गेलेले नाही.तिच्याकडे राज्याबाहेरील कंपनीच्या काही गर्भपाताच्या गोळ्या सापडल्या,त्याचा देखील तपास थंड आहे.ज्या गोळ्या राज्यात विक्रीला बंदी आहे त्या आल्या कोठून याचा तपास ना पोलीस करत आहेत ना अन्न व औषध प्रशासन.

सानप आणि मयत डोंगरे यांचे कॉल रेकॉर्ड काढून त्यांनी गेल्या काही महिन्यात सातत्याने ज्यांना ज्यांना कॉल केले त्यांची चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघड होऊ शकते.मात्र त्याचाही तपास होत नसल्याचे चित्र आहे.पोलिसांना नेमकं या प्रकरणात काय करायचं आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा,सीएस डॉ साबळे हे या प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी म्हणून पुढाकार घेत असताना पोलीस मात्र कासवगतीने तपास करून एक प्रकारे दोषींना सहकार्य तर करीत नाहींतना अशी चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click