December 10, 2022

इझी अ‍ॅनाटॉमी पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन !

इझी अ‍ॅनाटॉमी पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन !

बीड – बीड शहरात होमिओपॅथिक वैद्यकीय व्यवसायातून आपली ओळख निर्माण करणारे आणि आणि औरंगाबाद येथील सायली ट्रस्ट कॉलेज ऑफ होमिओपॅथिक महाविद्यालयात अ‍ॅनाटॉमी अर्थात शरिररचना शास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ.एस.पी.लड्डा यांंचे शरिररचना शास्त्र या विषयाचे सहज, सोप्या व सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेतील ‘इजी अ‍ॅनाटॉमी फॉर एक्झाम प्रिपरेशन’ या अत्यंत उपयुक्त आणि माहितीपुर्ण पुस्तकाचे येत्या 14 मे 2022 रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

औरंगाबाद येथील एमजीएम कॉम्प्लेक्स येथील ‘रुक्मिणी ऑडीटोरियम’मध्ये हा शानदार कार्यक्रम पार पडणार आहे. बीडच्या भूमिपुत्राचे हे शरिररचनेसंबंधीचे अभ्यासपूर्ण पुस्तक भारतासह अमेरिका, युरोप या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या सर्व पॅथीच्या प्रथमवर्ग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांपर्यत पोहचणार आहे.

बी जैन पब्लिशर्स या अग्रगण्य होमिओपॅथिक पुस्तक प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले त्यांचे ‘इझी अॅनाटॉमी’ हे पुस्तक आता प्रथम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

वैद्यक शास्त्रातील विविध शाखांमध्ये अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक हे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसह होमिओपॅथी, आयुर्वेदिक, नर्सिंग, फार्मसी, फिजिओथेरपी यासह इतर शाखांमध्ये अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना शरिर रचना शास्त्र हा विषय असतोच. तसा तो वैद्यकीय शास्त्रामध्ये अवघड विषय समजला जातो. मात्र डॉ. एस.पी.लड्डा यांनी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये हा विषय समजावा, असा प्रयत्न करत हे पुस्तक लिहिले आहे.

औरंगाबाद येथे होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेचे 22 वे ऑल इंडिया होमिओपॅथिक सायंटिफिक सेमिनारचे आयोजन 14 मे रोजी केले आहे. या ठिकाणी डॉ.एस.पी.लड्डा यांनी लिहिलेल्या ‘इजी अ‍ॅनाटॉमी फॉर एक्झाम प्रिपरेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. याप्रसंगी सेंट्रल कॉन्सिल ऑफ होमिओपॅथीचे माजी अध्यक्ष डॉ.रामजी सिंग,माजी उपाध्यक्ष डॉ.अरुण भस्मे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.दिल्ली येथील बी.जैन पब्लिकेशनने डॉ.लड्डा यांचे हे पुस्तक प्रकाशीत केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click