December 10, 2022

पूर्णवादी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम !

पूर्णवादी बँकेची आर्थिक स्थिती भक्कम !

बीड- राज्यभरात जाळे पसरलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे.बँकेला ऑडीट रिपोर्ट मध्ये देखील अ दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे भागधारक आणि ठेवीदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अध्यक्ष डॉ अरुण निरंतर यांनी केले आहे.


गेली काही दिवस पूर्णवादी बँकेच्या संदर्भात काही व्यक्तीमार्फत काही दैनिका मधून तसेच सोशल मीडियाद्वारे अपप्रचार चालू आहे. मी आपणास सांगू इच्छितो की, हा अपप्रचार केवळ बँकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केला जात आहे .बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे.मला आपणास सांगण्यास आनंद होतो की, 30.09.2022 रोजी संपलेल्या सहामाही अखेर बँकेच्या एकूण ठेवी या रू.776.94 कोटी व कर्जे रू.481.82 कोटीची आहेत तर बँकेचे भाग भांडवल रू.28.64कोटी एवढे आहे .आणि महत्वाचे म्हणजे बँकेचा Net NPA चे प्रमाण below 5%आहे व बँकेला या सहामाही अखेर रू.4.39 कोटीचा नेट प्रॉफिट झालेला असून बँकेचा CRAR रेशो हा 13.29 % इतका आहे त्याचप्रमाणे बँकेला सातत्याने “अ ” वर्ग प्राप्त झालेला आहे याचाच अर्थ बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे. तसेच बँकेने कोणतीही बेकायदेशीर कर्जे वाटलेली नाहीत व कोणालाही खिरपतीसारखी कर्जे वाटलेली नाहीत त्यामुळे खातेदारात घबराट वगैरे बातम्या यात काहीही तथ्य नाही.


आपण सर्वजण सुज्ञ आहात सर्वांना एकच विनंती की, भूलथापांना बळी पडू नका. आपणासर्वांचा माझ्या व माझ्या संचालकांच्या कार्यशैलीवर विश्वास आहेच तो कायम ठेवावा.. पूर्णवादी बँक सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे केवळ मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन अध्यक्ष डॉ अरुण निरंतर यांनी केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click