बीड – महाशिवरात्रच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शिवालयाच्या ठिकाणी भावीक भक्तांची गर्दी होणार आहे. त्यामुळे कोव्हीड-१९ विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शिवालये दिनांक ११ मार्च २०२१ रोजी दर्शनासाठी पुर्णतः बंद राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.
सदरील कालावधीत फक्त या पुजारी व विश्वस्त यांना कोरोना विषयक जे नियम आहेत त्याचे पालन करून प्रथेप्रमाणे पुजा व इतर बाबी करण्यास परवानगी असेल.परंतु भाविक भक्त यांना दर्शनासाठी पुर्णत: बंद असणार आहे
या आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर ‘भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.
राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोचिड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.