December 10, 2022

आनंद भाटेंच्या सुरात बीडकर न्हाऊन निघाले !

आनंद भाटेंच्या सुरात बीडकर न्हाऊन निघाले !

बीड – बंदिष,ठुमरी नाट्यसंगीत, चित्रपट संगीत, अशा विविध गायन प्रकारांनी रसिकची पाडवा पहाट बीडकरांना एक वेगळी मेजवानी देऊन गेली. पंडित आनंद भाटे यांनी आपल्या चतुरस्त्र गायनाने बीडकरांना मंत्रमुग्ध केले.


प्रतिवर्षीप्रमाणे फाउंडेशन च्या वतीने दि.26 ,ऑक्टोंबर 2022रोजी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित आनंद भाटे यांच्या आवाजाची जादू बीडकरांनी अनुभवली. सुरुवातीला भाटे यांनी ललत रागातील रागातील ‘नयनन का सपना, कैसे कहू अपना’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर बडे गुलाम अली खान यांची गाजलेली ठुमरी ‘का करू सजनी आये न बालम’ संगीत मानापमान नाटकातील ‘देहाता शरणागता’ संगीत सौभद्र मधील नाट्यपद ‘वद जाऊ कुणाला शरण ग’, ‘चांद माझा हा हासरा’, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे ‘युवती मना..’ पंडित भीमसेनजोशी यांचे ‘इंद्रायणी काठी’ ‘बाजे रे मुरलिया बाजे’ ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ अशा बहारदार सादरीकरणाने मैफिलित रंग भरला. भाटेंचा स्वर तबल्यावर भरत कामतांचा ठेका ,आणि संवादिनीवर राहुल गोले यांची साथ दाद देऊन गेली.

मैफिलीचीसांगता बालगंधर्वांच्या ‘चिन्मया सकल हृदया’ या भैरवीने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसिक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरिकर यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार रसिकचे सचिव मिलिंद सुंदर यांनी मानले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन पाहुणे कलाकार पं आनंद भाटे ,रसिकचे अध्यक्ष डॉ अनुराग पांगरीकर ,अमरडागा कल्पतरू भोजनालयाचे श्रीनिवास कुलकर्णी व सौ मंजुषा कुलकर्णी, प्राईम रोज बेकरीचे सुदर्शन धुतेकर व हॉटेल अन्विताचे श्री वाय जनार्दन राव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसिकचे संचालक अमर डागा, डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, दीपक कर्नावट, वाय. जनार्दनराव, विकास उमापूरकर, प्रदीप मुळे, राम मोटवानी, डॉ प्रसन्न कुलकर्णी, गोपाल मालू, सुदर्शन धुतेकर, ईश्वर मुथा,डॉ. अनिल बारकुल ,राजेंद्र मुनोत यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click