December 10, 2022

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष !

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष !

मुंबई- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची निवड करण्यात आली तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची कोषाध्यक्ष पदी आणि जय शहा यांची सचिव पदी निवड करण्यात आली.

‘बीसीसीआय’ पदाधिकारी निवडणुकीसाठी दि. ११ आणि १२ ऑक्‍टोबर रोजी अर्ज दाखल झाले. १३ ऑक्‍टोबर अर्जांची छाननी झाली. आज मुंबईतील ताज हाॅटेलमध्‍ये निवडणूक पार पडली. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत राज्य संघटनांच्या प्रतिनिधींची यादी आली होती. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्या जागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले होते. रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. सौरव गांगुली यांनी २३ ऑक्‍टोबर २०१९ रोजी बीसीसीआय अध्‍यक्षपदाची धुरा संभाळली होती. तर २४ ऑक्‍टोबर २०१९ रोजी जय शाह यांनी सचिवपदाची सूत्रे स्‍वीकारली होती. दोघांचाही कार्यकाळ ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये संपणार होता.

अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी १९७९ ते १९८७ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी २७ कसोटी सामन्‍यांमध्‍ये ८३० धावा केल्या आहेत. तर ७२ एकदिवसीय सामन्यात ६२९ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे. रॉजर बिन्नीने २७ कसोटीमध्ये ४७ विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स घेतल्या आहेत. रॉजर बिन्नी यांचा १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होते. १९८३ विश्वचषक स्‍पर्धेत त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click