मुंबई – गजोधर या आपल्या आगळ्या वेगळ्या पात्रामुळे देशभरात गाजलेला प्रसिद्ध विनोदी कलाकार,अभिनेता राजू श्रीवास्तव याचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.मृत्यूसमयी त्याचे वय 52 वर्ष होते.राजू च्या निधनाने बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. कित्येक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी तो ट्रेड मिलवर धावत असताना त्याला चानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्सममध्ये दाखल करण्यात आले होते.
90 च्या दशकांतील टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका करुन राजु श्रीवास्तवची मोठी झलक इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये दिसली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या लाफ्टर चँलेजचे विजेतेपद हे सुनील पालनं मिळवलं होतं. मात्र त्यात सगळ्यात लक्षवेधी ठरला तो राजु श्रीवास्तव. राजुनं त्या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली. घराघरात त्याचे नाव झाले. तो प्रेक्षकांच्या आवडीचा सेलिब्रेटी झाला होता. आता मात्र त्याच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राजुनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले. त्यानं मालिका. चित्रपट, जाहिराती यामध्ये काम केले. याशिवाय काही हिंदी विनोदी नाटकांमध्ये देखील त्यानं केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते.