February 8, 2023

भारत सासणे संमेलनाध्यक्ष !

भारत सासणे संमेलनाध्यक्ष !

बीड- जेष्ठ साहित्यिक तथा बीडचे माजी जिल्हाधिकारी भारत सासणे यांची उदगीर येथे होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.मोठ्या वादानंतर अखेर अध्यक्षांची निवड झाल्याने वादाची परंपरा कायम राहिले आहे.

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर येथे महामंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी सर्वांनुमते ही घोषणा करण्यात आली.

भारत सासणे हे वैजापूरला ४ एप्रिल २०१० रोजी झालेल्या ५व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे ९ आणि १० नोव्हेंबर २०१४ या काळात आयोजित केलेल्या ३५व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील भारत सासणे यांच्याकडे होते. याशिवाय नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे १४ फेब्रुवारी २०१६ रोजी भरलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं आहे. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्यावतीने समग्र साहित्य सेवेबद्दल सूर्योदय पुरस्कारदेऊनही सासणे यांना गौरवण्यात आलं आहे.

अदृष्ट (दीर्घकथा संग्रह),अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह)अस्वस्थ (दीर्घकथा संग्रह)आतंक (दोन अंकी नाटक)आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह)ऐसा दुस्तर संसार (दीर्घकथा संग्रह)कॅंप/बाबींचं दुःख (दीर्घकथा संग्रह)चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका)चिरदाह (दीर्घकथा संग्रह)जंगलातील दूरचा प्रवास (मुलांसाठी कादंबरी)चिरदाह (दीर्घकथा संग्रह)जॉन आणि अंजिरी पक्षी (लेखकाचा पहिला कथासंग्रह)त्वचा (दीर्घकथा संग्रह)दाट काळा पाऊस (दीर्घकथा)दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरिका)

दोन मित्र (कादंबरी)नैनं दहति पावकःबंद दरवाजा (कथासंग्रह)मरणरंग (तीन अंकी नाटक)राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी)लाल फुलांचे झाड (कथासंग्रह)वाटा आणि मुक्काम (सहलेखक – आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया)विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह)शुभ वर्तमान (कथासंग्रह)सटवाईचा लेख (पाच भागात वाटल्या गेलेल्या लेखांचा संग्रह)स्यमंतक मण्याचे प्रकरण (कथासंग्रह)क्षितिजावरची रात्र (दीर्घकथा संग्रह)

बीड येथे काहीकाळ सासणे यांनी जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click