September 30, 2022

सुरांच्या गारुडाने कंकालेश्वर महोत्सवात रसिक चिंब !

सुरांच्या गारुडाने कंकालेश्वर महोत्सवात रसिक चिंब !

बीड/वार्ताहर
आपल्या भारदस्त आवाजाने पं. संजय गरुड यांनी रौप्य मोहोत्सवी कनकालेश्वर मोहोत्सवास उपस्थित रसिकांवर सुरांचे गारुड करीत केले.भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीचा वारसा समृद्धपणे पुढे नेत असल्याचा विश्वास त्यांनी आपल्या गायकीने उपस्थित रसिक श्रोत्यांना दिला.संस्कार भारती बीड आयोजित या मोहोत्सवात देवगिरी प्रांताचे अध्यक्ष भारत लोळगे यांचा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते अमृत मोहोत्सवा निमित्त सत्कार करण्यात आला.

प्रतिवर्षी चैत्र पाडव्याला आयोजित केला जाणारा कनकालेश्वर मोहोत्सव यावर्षी करोना परिस्थितीमुळे त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरू नानक जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी ( दि.19 नोव्हेंबर ) ऐतिहासिक कनकालेश्वर मंदिराच्या जलाशयातील तरंगत्या रंगमंचावर संपन्न झाला. नगराध्यक्ष डॉ.भारभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,संस्कार भारती देवगिरी प्रांताचे अध्यक्ष भारत लोळगे,महामंत्री डॉ.जगदीश देशमुख,मातृशक्ती प्रमुख स्नेहलताई पाठक, नाट्यविधा प्रमुख सुनीताताई घाटे,सौ. गुलाबताई लोळगे आणि संस्कार भारती बीडचे अध्यक्ष प्रमोद वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलित करून मोहोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नामदेव साळुंके आणि सहगायकांनी संस्कार भारती गीताच्या समूहगायनाने केली.

तर नृत्यगुरू अनुराधाताई चिंचोलकर यांच्या शिष्य विद्यार्थिनींनी दोन समूह नृत्य भरतनाट्यम शैलीत सादर करीत रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.यानंतर भारत लोळगे यांच्या वयाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा अमृत मोहोत्सवी सत्कार करण्यात आला. याच वेळी मान्यवरांच्या हस्ते संस्कार भारतीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप पं. संजय गरुड यांच्या गायनाने करण्यात आला. गरुड यांनी प्रारंभी विठूनामाचा गजर करीत नंतर पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या रचना त्यांच्याच शैलीत तयारीने सादर केल्या.’ पंढरी निवासा सख्या पांडुरंगा’, सौभाग्यदा लक्ष्मी ‘, ‘ माझे माहेर पंढरी ‘, ‘ बाजे मुरलिया बाजे ‘, ही भजने त्यांनी विस्ताराने रंगवली.आणि गायनाचा समारोप ‘ आगा वैकुंठीच्या राया ‘ या भैरवी रागातील भजनाने केली.त्यांना हार्मोनियमवर सुदर्शन धुतेकर,तबल्यावर निषाद पवार,पखावजवर माऊली फाटक तर टाळ साथ मंगेश लोळगे यांनी केली.


सुरश्री भारत लोळगे यांनी आपल्या गायन वादन, अभिनय कौशल्याने बीडची वेगळी ओळख निर्माण केली असून ते बीडचे सांस्कृतिक वैभव आहेत असे गौरवोदगार जयदत्त क्षीरसागर यांनी काढले.बीडला गायन वादन, कीर्तन,नाट्यकलेची समृद्ध सांस्कृतिक परंपरा असून ती मोठी करण्याचे कार्य लोळगे यांनी केल्याचे ते म्हणाले. तर नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी कनकालेश्वर मोहोत्सवामुळे बीडचे नाव संपूर्ण भारतभर झाले असून या मोहोत्सवामुळे बीडची ओळख संस्कृतीसंपन्न शहर अशी सर्वत्र झाल्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे म्हंटले.यावेळी डॉ.जगदीश देशमुख,स्नेहलताई पाठक , कुलदीप धुमाळे आणि सत्कारमूर्ती भारत लोळगे यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन संतोष पारगावकर यांनी केले. कार्यक्रमास बीडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्कार भारती बीडचे वासुदेव निलंगेकर, प्रभाकरराव महाजन महेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीकांत सौंदत्तीकर, केदारनाथ बहिरमल, गणेश स्वामी, अनिल कुलकर्णी, राहुल पांडव, गणेश तालखेडकर, लक्ष्मीकांत खडकिकर आदींनी परिश्रम घेतले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click