November 30, 2021

रौप्यमहोत्सवी कंकालेश्वर महोत्सवात पंडित संजय गरुड यांचे गायन !

रौप्यमहोत्सवी कंकालेश्वर महोत्सवात पंडित संजय गरुड यांचे गायन !

बीड-उद्या शुक्रवार दि 19 नोव्हेंबर रोजी गुरू नानक जयंतीचे औचित्य साधून रौप्यमहोत्सवी कनकालेश्वर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांताचे अध्यक्ष भारत लोळगे यांचा त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाबद्दल नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.या निमित्ताने पं. संजय गरुड यांच्या सुश्राव्य गायनाने आयोजन करण्यात आले आहे.


संस्कार भारती, बीड आयोजित कनकालेश्वर मोहोत्सवाचे यंदा 25 वे वर्ष असून प्रतिवर्षी चैत्र पाडव्याला हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी या मोहोत्सवाचे आयोजन केले जाते पण कोव्हीड परिस्थितीमुळे यंदा हा मोहोत्सव कनकालेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक जलकुंडात तरंगत्या रंगमंचावर शुक्रवारी रंगणार आहे.गायन,वादन, नृत्य,साहित्य याचे दर्जेदार सादरीकरण आणि कला संस्कृतीचे जतन आणि संवर्धन हा या मोहोत्सवाचा हेतू आहे. यावर्षी संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांताचे अध्यक्ष तथा जेष्ठ गायक,रंगकर्मी भारत लोळगे यांचा अमृत मोहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार आयोजित करण्यात आला आहे. पुणे येथील सुविख्यात गायक पं. संजय गरुड यांचे गायन आणि संस्कार भारतीच्या कलासाधक विद्यार्थिनी अनुराधा चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली समूह नृत्य आणि नृत्यनाटिका सादर करणार आहेत.

सायंकाळी 6 वाजता आयोजित या मोहोत्सवास रसिक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्कार भारती , बीडचे अध्यक्ष प्रमोद वझे यांनी केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *