मुंबई – क्रूझवर रेव्ह पार्टीत गुंग असलेल्या शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे.जामीन नाकारल्याने आर्यन पुढील अडचणी वाढल्या आहेत .
१३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले.
एनसीबीने आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासलं असून याआधीही अनेक संभाषणांचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केलं होतं असं समोर आलं आहे. २ ऑक्टोबरला झालेल्या क्रूझ पार्टीतल्या ड्रग्जसंबंधी दोघांमध्ये बोलणं झालं होतं. याच पार्टीनंतर आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत नंतर अटकेची कारवाई केली होती.