October 17, 2021

शाहरुख खान च्या पोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात !

शाहरुख खान च्या पोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात !

मुंबई -मुंबईत अंमली पदार्थ विरोधी विभागाने केलेल्या कारवाईमुळे बॉलिवूड मध्ये खळबळ माजली आहे .या कारवाईत रेव्ह पार्टी करणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाचा समावेश आहे .

मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस जहाजावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीच्या (अंमली पदार्थ विरोधी विभाग) पथकाने धाड टाकली. गेल्या काही दिवसांतील एनसीबीची ही मोठी कारवाई मानली जात आहे. एनसीबीने रेव्ह पार्टी सुरू झाल्यानंतर ही कारवाई केली. यावेळी अंमली पदार्थांचं सेवन करताना 8 जणांना अटक करण्यात आली.यामध्ये अभिनेता शाहरुख खान चा मुलगा आर्यन यालाही ताब्यात घेण्यात आल आहे.

एनसीबीने या कारवाईवेळी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेतलं. त्याची रेव्ह पार्टी संदर्भात चौकशी केली जात आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी याबद्दलची अधिक माहिती दिली .

‘रेव्ह पार्टी प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खान याची चौकशी केली जात आहे. त्याच्याविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तसंच अटकही केलेली नाही. याप्रकरणात जहाजाचे मालक आणि पार्टी आयोजित करणाऱ्या कंपनीच्या मालका चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे. याबद्दलची अधिक माहिती दुपारी देण्यात येईल’, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *