बीड – जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाची अँटिजेंन टेस्ट निगेटिव्ह आहे अस सांगून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देऊन पुन्हा त्यांच्यावरच गुन्हा दाखल करून गावाकडून मृतदेह आणून त्या मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी सीएस सूर्यकांत गित्ते व इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे .याबाबत बीड शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील लता सुरवसे या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते,त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला .त्यानंतर नातेवाईकांनी अँटिजेंन टेस्ट करण्याची मागणी केली .दोन वेळा टेस्ट केली तरी निगेटिव्ह आल्याने मृतदेह ताब्यात देण्यात आला .
नातेवाईक गावाकडे गेल्यानंतर एसीएस डॉ सुखदेव राठोड यांनी फोन करून मृतदेह परत घेऊन येण्यास सांगितले, त्यानंतर भगवान बाबा स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .मात्र हे करताना प्रशासनाने केलेली अक्षम्य चुकीमुळे मृतदेहाची अवहेलना झाली .
या प्रकरणी सीएस डॉ सूर्यकांत गित्ते,एसीएस डॉ राठोड यांच्यासह स्टाफवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत महिलेचे भाऊ ऍड सुभाष कबाडे यांनी केली आहे,याबाबत पोलिसात तक्रार देखील देण्यात आली आहे .