September 20, 2021

राजीव सातव यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय ?

राजीव सातव यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय ?

पुणे – खासदार राजीव सातव यांचे पुण्यात रविवारी पहाटे जहांगीर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता. तसेच त्यांना सेकंडरी न्यूमोनिया आणि मल्टी ऑर्गन फेल्यूअर सिंड्रोम होता, अशी माहिती जहांगीर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सत्यजित गिल यांनी दिली.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोना झाल्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती. पण त्यानंतर त्यांना सायटोमेगॅलो विषाणूची लागण झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली.

सायटोमेगॅलो हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेमध्ये ४० वर्ष पूर्ण झालेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरीरात हा विषाणू आढळून येतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लाळ किंवा थुंकीद्वारे संक्रमित करतो.

डोकेदुखे, श्वास घेताना अडचण येते, ताप येणे ही सायटोमेगॅलोची लक्षणं आहेत. सायटोमेगॅलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो. सायटोमेगॅलोचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणंही दिसून येतात. सायटोमेगॅलोचा संसर्गचं निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *