बीड – बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशाचे पालन न करता भल्या पहाटे चार ते सात वाजेपर्यंत बिनधास्तपणे धंदा करणाऱ्या बीड मोंढ्यातील अकरा किराणा दुकानांना सील करण्याची कारवाई तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने केली आहे एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना कडक लोक डाउन प्रशासन करत आहे तर दुसरीकडे किराणा दुकानदार हे बाहेरून बंद आणि आतून चालू असा उद्योग करत असल्याने कोरुन वाढण्यास मदत होत आहे त्यामुळे प्रशासनाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे
बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून दररोज दीड हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी 25 मार्च पासून बीड जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व स्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानंतर राज्य सरकारने खडक लोक डाऊन 15 मे पर्यंत वाढवला त्यामुळे मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केले होते प्रशासन आरोग्य व्यवस्था आणि आणि पोलीस 24 तास मेहनत घेत असताना त्याला काही व्यापारी मात्र हरताळ फासत असल्याचे चित्र बीडमध्ये दिसून आले
बीडच्या मोंढा भागातील छाया ट्रेडर्स,व्यंकटेश ट्रेडर्स ,मिटकरी ,गुळाचे व्यापारी अशा नामांकित दुकाना सह तब्बल अकरा दुकाने ही पहाटे चार ते सात या वेळेत सुरू ठेवून कोरूना नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी बीडचे तहसीलदार शिरीष वमने आणि त्यांच्या पथकाने तब्बल अकरा दुकाने सील करण्याची कारवाई केली आहे ज्या पद्धतीने किराणा व्यापारी लोक डाऊन चे नियम मोडत आहेत ते पाहता दत्तक याकडे व्यापारी महासंघाने देखील लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा प्रशासनाने कितीही कळत लोक जाऊन केला तरीदेखील व्यापाऱ्यांनी सहकार्य न केल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होणार नाही.