नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे .त्यांनी याबाबत एका खाजगी वृत्तवाहिनी ला माहिती दिली आहे .
आयपीएल च्या कोलकाता विरुद्ध बंगलोर या सोमवारच्या सामान्य आधी कोलकाता चे दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने हा सामना रद्द करण्यात आला होता,त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे .याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून आयपीएलला सुद्धा याचा फटका बसला आहे. एकापाठोपाठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यामुळे आयपीएल सीझन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याबद्दल राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे सोमवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध कोलकाताचा सामना रद्द करण्यात आला आहे. आजच्या सामन्यावर सुद्धा कोरोनाचे संकट ओढावले होते. पण योग्य ती खबरदारी घेत, सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे