बीड – एप्रिल महिन्यात सर्वच विकेंड ला संपूर्ण संचारबंदी असल्याने एसटी वाहतूक सुरू राहणार की नाही याबाबत शंका होती मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकेंड ला देखील सरकारी वाहतूक अर्थात एसटी च्या फेऱ्या सुरू राहणार आहेत,मात्र प्रवाशी नसल्यास ही वाहतूक सुरू ठेवून सरकार अन महामंडळ काय साध्य करणार आहे हा प्रश्नच आहे .
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक निर्बंध आणि शनिवार रविवारी वीकेंड लॉक डाऊन ची घोषणा केली,त्यामध्ये लोकल ट्रेन,एसटी वाहतूक तसेच खाजगी वाहतूक करण्यास देखील परवानगी देण्यात आली होती .
मागील सोमवार ते शुक्रवार पर्यंत लोकांनी लॉक डाऊन ला विरोध करत करत का होईना नियम पाळले,आता उद्या आणि परवा दोन दिवस विकेंड लॉक डाऊन असणार आहे,त्यावेळी एसटी सुरू राहणार का हा प्रश्न होता,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी सुरू राहणार आहे .
गेल्या काही दिवसापासून एसटी वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली होती,एका सीटवर एक प्रवाशी अशी आसनव्यवस्था करण्यात आली होती .आता हीच आसनव्यवस्था उद्या आणि परवा देखील असणार आहे .मात्र या दोन दिवसात प्रवाशी बाहेर पडतील का याबाबत महामंडळाला शंकाच आहे .