बीड – बीड जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद असतील ही बातमी आम्ही न्यूज अँड व्युज या वेब पोर्टलवर सात वाजण्याच्या सुमारास प्रसारित केली अन एकच खळबळ उडाली .अनेकांना यामध्ये कन्फ्युजन झाले,मला अन सहकारी विकास उमापूरकर याला शेकडो व्यापारी,सामान्य नागरिक यांचे जिल्हाभरातूनच नव्हे तर बाहेरून देखील फोन आले,मात्र सगळ्यांच कन्फ्युजन दूर झाल अन पुन्हा एकदा आमच्या वरील अन पोर्टलवरील विश्वास अधिक दृढ झाला .
बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन होता,हा शिथिल केल्याचे आदेश रविवारी जिल्हाधिकारी यांनी काढले अन बीड जिल्ह्यात राज्य शासनाने लागू केलेला ब्रेक द चेन हा कार्यक्रम 15 एप्रिल पर्यंत लागु असणार नाही असा सगळ्यांचा समज झाला .
मात्र सायंकाळी सात च्या दरम्यान जिल्हा प्रशासनाने नवे आदेश काढले,मिनिटात हे आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले मात्र सगळ्यांना वाटले शनिवार रविवार ( 10- 11,17-18,24-25) या दिवशी सगळी दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद असतील अन लोक खुश झाले .
पण राज्य शासनाने ताकाला जाऊन कसे भांडे लपवले आहे हे आमच्या कालच लक्षात आले होते ज्याचा खुलासा लोकांना आजच्या जिल्हाधिकारी यांच्या सायंकाळच्या आदेशामुळे झाला .आम्ही न्यूज अँड व्युज वर याबाबत उद्यापासून लॉक डाऊन,अत्यावश्यक सेवा वगळता सगळं बंद अशी बातमी केली अन हे खरं आहे का?काहीतरी चुकले आहे?बातमी खोटी आहे?तुम्ही ऑर्डर नीट वाचा?अस कस होईल? असे एक ना अनेक प्रश्न विचारणारे अन कन्फ्युज आहे अस म्हणणारे शेकडो फोन दहा वाजेपर्यंत सुरूच होते .
प्रत्येकाला ऑर्डर नेमकी काय आहे,कन्फ्युज होण्याची गरज नाही अस सांगून समाधान केलं.अहो तुम्ही बातमी केली म्हणून आम्ही अनेकांना पाठवली लोक आम्हाला फोन करत आहेत अस म्हणत हजारो ग्रुपवर ही बातमी काही वेळात गेली .लोकांनी आम्हाला फोन करून विचारणा केली,कन्फर्म केलं,त्याबद्दल आम्हालाही समाधान आहे .
लोकहो आम्ही बातमी देताना भलेही उशीर होईल पण कन्फर्म झाल्याशिवाय अन अनेकांनी खात्रीपूर्वक सांगितल्याशिवाय प्रसारित करत नाहीत,यापूर्वी सुद्धा 23 मार्च ला 25 पासून जिल्ह्यात लॉक डाऊन ही बातमी आम्ही सर्वप्रथम केली होती .तेव्हाही शेकडो फोन आले होते आजही तेच झाले,वाचकांचा हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू अन अशाच खऱ्या बातम्या देण्याचा प्रयत्न करू,आपलं प्रेम अन सहकार्य असच राहू द्या .