चेन्नई – मी निवडून आलो तर प्रत्येकाला आयफोन,कार,हेलिकॉप्टर, रोबोट देईल शिवाय चंद्रावर सहलीला घेऊन जाईल असे आश्वासन एका उमेदवाराने दिल्याने चर्चेचा विषय होत आहे .तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उमेदवाराचा या जाहीरनाम्या बाबत लोक हसून चर्चा करीत आहेत
मी निवडून आल्यास प्रत्येक घरामागे एक आयफोन, कार, हेलिकॉप्टर, रोबोट देईन. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला स्विमिंग पूलसह तीन मजली घर, तरुणांना एक कोटी रुपये देईन. याशिवाय चंद्रांवर १०० दिवस सहलीला घेऊन जाईन, अशी आश्वासनं सरावनान यांनी दिली आहेत. मतदारांसोबतच मतदारसंघासाठीही त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली आहेत. मतदारसंघात अंतराळ संशोधन केंद्र, रॉकेट लॉन्चिंग साईट आणि ३०० फुटांचा कृत्रिम हिमनग उभारण्यात येईल, अशी घोषणादेखील सरावनान यांनी केली.
लोकांच्या मनात जागरुकता निर्माण व्हावी, तरुणांचा राजकारणातील सहभाग वाढावा यासाठी निवडणूक लढवत असल्याचं सरावनान यांनी सांगितलं. निवडणूक कशी लढवायची असते याची अनेकांना कल्पना नसते. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठीच मी निवडणूक लढवत आहे, अशा शब्दांत सरावनान यांनी त्यांचा उद्देश सांगितला. निवडणूक, मतदान याबद्दल जनजागृती झाल्यास त्याचा लाभ समाजाला होईल. राजकीय नेत्यांवर लोकांचा वचक राहील, असं सरावनान म्हणाले.