बीड – कोरोना बाधितांचा वाढत असलेला आकडा आणि त्याला आळा घालण्यासाठी म्हणून बुधवार पासून जिल्हा पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .याबाबत अधिकृत घोषणा किंवा आदेश अद्याप काढले गेलेले नाहीत मात्र लवकरच ते निघतील अशी माहिती आहे .
बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात दोन हजार पेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत .प्रशासनाने अनेकवेळा विनंती करूनही नागरिक सहकार्य करत नसल्याने हा आकडा वाढतो आहे .जिल्हा प्रशासनाने सर्वच व्यापारी प्रतिष्ठान व इतर दुकाने सायंकाळी सात ते सकाळी सात पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते .
तरीदेखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने अखेर बुधवार पासून जिल्हा संपूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,याबाबत अद्याप तरी अधिकृत आदेश आलेले नाहीत.हा लॉक डाऊन किती दिवसासाठी असेल याची माहिती नाही मात्र 24 ते 27 असा तीन दिवसासाठी जिल्हा बंद केला जाऊ शकतो .