December 10, 2022

टीईटी अपात्र शिक्षकांची उद्या औरंगाबाद ला सुनावणी !

टीईटी अपात्र शिक्षकांची उद्या औरंगाबाद ला सुनावणी !

बीड- टीईटी घोटाळ्यामध्ये अडकलेल्या आणि अपात्र ठरलेल्या शिक्षकांच्या बाबत निर्णय घेण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद सहसंचालक कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे.बीड जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या 23 शिक्षकांना शिक्षण विभागाने सुनावणीस हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

राज्यात टीईटी घोटाळा उघडकीस आल्यानंतर मोठा गदारोळ झाला.राज्याचे विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे या यादीत असल्याने विरोधकांनी राज्यभर निदर्शने केली होती. दरम्यान यातील बहुतांश शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती.त्यामुळे या शिक्षकांच्या वेतनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेऊ नये असे न्यायालयाने म्हटले होते.

दरम्यान औरंगाबाद येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने बीड जिल्ह्यातील अपात्र शिक्षकांना नोटीस बजावली आहे, त्यानुसार 23 शिक्षकांना बुधवार 23 नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यामध्ये धर्मेंद्र नवले ( माध्यमिक विद्यालय चकलांबा),विकास सातपुते ( योगेश्वरी विद्यालय अंबाजोगाई),धनंजय इंगोले,केदार जोशी,सुप्रिया कांबळे,सरस्वती गिरी ( सर्व चंपावती विद्यालय,बीड),अभिजित जगताप ( पारगाव हायस्कुल,पारगाव),सुरेखा कांबळे ( बोरखेड हायस्कुल,बोरखेड),रुपाली देशमुख ( व्यंकटेश पब्लिक स्कुल बीड),नितीन सोनवणे (डी बी घुमरे स्कुल ,अंबाजोगाई),ज्योती शिंदे ( खोलेश्वर विद्यालय,अंबाजोगाई),माधुरी बारटक्के,बाळासाहेब शिंदे ( दोन्ही राजमाता विद्यालय,माटेगाव आणि रोहितळ),विशाखा गंगाधरे ( न्यू हायस्कुल गेवराई),प्रशांत जाधव ( न्यू हायस्कुल सादोळा),राजा तडवी ( अबूबई विद्यालय,मांडखेल),नटवर पटेल (महाराष्ट्र विद्यालय,मोहा),गणेश शेलार ( जवाहर विद्यामंदिर निर्गुडी),नविद शेख ( सुभद्राबाई विद्यालय,तागडगाव),सुरेश घरगीने ( पाडळी हायस्कुल,पाडळी),अर्चना जोगदंड ( कालिकादेवी विद्यालय,शिरूर) या माध्यमिक विभागाच्या शिक्षकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click