बीड – राज्य शिक्षक संघाच्या पनवेल येथील अधिवेशनास मोठ्या संख्येने शिक्षक बांधव,भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन अण्णासाहेब लोणकर यांनी केले आहे.18 मार्च रोजी हे अधिवेशन होणार आहे.
गेवराई येथे आयोजित बैठकीत लोणकर यांनी आपली भूमिका मांडली.शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात आणि राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षकांना एकत्रित करून शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी लढत आजच्या शिक्षकांना आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्याचे काम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केलेले आहे महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांचे जे काही प्रश्न आजपर्यंत सुटले आहेत ते सर्व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या व्यासपीठावरच सुटलेले आहेत.
त्यामुळे या संघटनेचे हे अधिवेशन पनवेल या ठिकाणी दि.18 मार्च 2022 रोजी होत आहे या अधिवेशनात आपल्या शिक्षकांचे आज पर्यंत दडून राहिलेले प्रश्न नक्कीच सुटणार आहेत म्हणून आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या अधिवेशनासाठी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अण्णासाहेब लोणकर यांनी केले आहे.
या बैठकीला तात्यासाहेब मेघारे, विष्णू खेत्रे बाळराजे तळेकर, गणेश सुळे, विलास दुधाळ,
, प्रताप कुडके, धनंजय सुलाखे, सुरेशराव सानप,भगवान फुंदे ,दिलीप नरुटे,भागवत खेडकर, नारायणराव बारगजे, बापुसाहेब तारुकर,ताराचंद कवरे ,फय्याज खान, ज्ञानोबा सगळे, भाऊसाहेब जोशी, नंदकिशोर खरात,काळुसिंग ठाकरे, नारायणराव मराठे,राम चौधरी, अच्युत आर्दड, भास्कर सोलाट,आर्जुन सुतार, शिवाजी आव्हाड, बाजीराव मरकड,काळुसिंग सोनवणे,शामलाल नवले, प्रकाश खरात,सारंग देशपांडे, धर्मराज करपे ,संदिप निंबाळकर,सचिन दाभाडे, शिवाजी खोले,नितीन बागलाने, जगन्नाथ जाधव, सुधाकर घोडके,गणेश बांगर, गोरक्षनाथ पवार, गंगाधर मस्के ,संजय ठाकुर, गणेश सानप, भगवान कोळी,सतिश पल्लेवाड ,महेश पघळ, प्रशांत मस्के,सुरेश ढाकणे, रघुनाथ मोहळकर ,महादेव कारंडे,सचिन गायकवाड, आसाराम चादर,अनिल गोर्डे,अभय देशपांडे, विलास पवार, नितीन ढाकणे, शिवाजीराव सानप,सचिन भंडारे,शरद तांबारे, प्रल्हाद खेत्रे,शेख आसेफ,शेरखा पठाण, नंदलाल सपाटे, संतोष कोठेकर संदीपान घोंगडे,आपेट सर,मदन हात्ते ,मुकुंद आहेर, शिवनाथ शिंदे, रविंद्र गाडे ,विजय सांगळे,, जगदिश ढाकणे,उमेश लगड, संतोष कोरे, गणेश ढोबळे,सुरेश तळेकर,प्रविण घोडके,आदिनाथ वाडेकर,संदिप गायकवाड,आण्णासाहेब धुतडमल,चव्हाण सर,राठोड सर,हनुमान सरवदे,सुनिल चौधरी. आदी शिक्षक उपस्थित होते.