November 26, 2022

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू होणार !

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू होणार !

मुंबई – राज्यात सोमवार दि. 24 जानेवारी पासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू करण्यात यावीत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.

महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व त्याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे व निवासी शाळा सुरू करावीत तसेच यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिले आहेत.

राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी कोविडची परिस्थिती आटोक्यात येत असून, सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांमध्ये व निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत, त्या-त्या स्थानिक प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने स्थानिक नियमावलीला अनुसरून व आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click