December 10, 2022

राजकारण,समाजकारण, शेती,क्रीडा क्षेत्रातील धुरंदर !!

राजकारण,समाजकारण, शेती,क्रीडा क्षेत्रातील धुरंदर !!

लक्ष्मीकांत रुईकर / विशेष संपादकीय

काही माणसाचं राजकारण,समाजकारणातील स्थान अढळ असतं. त्यामागे त्यांचा त्याग,अनुभव आणि समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती कारणीभूत ठरते. गेल्या पाच दशकापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणावर अन समाजकारणावर ज्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे ते व्यक्तिमत्त्व म्हणजे माजीमंत्री शिवाजीराव पंडित उपाख्य दादा.शेती असो की मराठा समाजाचे आंदोलन अथवा राजकारण प्रत्येक क्षेत्रात दादांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात तरुणाला लाजवेल असा उत्साह ज्या माणसात आहे ती व्यक्ती म्हणजे शरद पवार.अन याच पवारांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत राजकीय वाटचाल करणारे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणजे शिवाजीराव पंडित.त्यांच्या सत्कारनिमित्ताने त्यांना शतायुष्य लाभो हीच प्रार्थना.

बीड जिल्ह्याचा राजकीय इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल त्यामध्ये एक नाव आवर्जून घेतले जाईल अन ते म्हणजे शिवाजीराव पंडित यांचे.गेवराई तालुक्यातील मूळ दैठण चे रहिवाशी असणाऱ्या दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्यभर आपलं अन जिल्ह्याचं नाव मोठं केलं.जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष ते आमदार,मंत्री असा त्यांचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे.दादा जेव्हा राजकारणात होते तो काळ काँग्रेस संस्कृतीचा होता.शरद पवार यांच्यासारख्या मुर्रबी राजकारणी व्यक्तिमत्वासोबत त्यांनी राजकीय जीवनाला प्रारंभ केला.गेवराई तालुक्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या उजव्या अन डाव्या कालव्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते गेवराईकर कधीच विसरू शकणार नाहीत.

जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपल्या भागातील शेतकरी सुखी अन संपन्न झाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सहकारासोबतच खेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कास अन आस वाटावी म्हणून त्यांनी शिक्षण संस्थांचे जाळे उभारले.मार्केट कमिटी असो की सूतगिरणी या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस असो की एस काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस, दादांनी शरद पवार यांची साथ खंबीरपणे दिली.मध्यंतरी जेष्ठ चिरंजीव अमरसिंह पंडित हे भाजप वासी झाले होते त्यावेळी देखील दादा राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच होते हे उल्लेखनीय आहे. सहा साडेसहा फूट उंची,डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी,कुर्ता अन धोतर हा पेहराव त्यांच्या व्यक्तिमत्वाला चारचांद लावतो.राजकारणी व्यक्तीच रूप अन ते ही अस्सल ग्रामीण भागातील कस असावं हे दादांकडे पाहिल्यावर लक्षात येतं.

85 वर्ष वय झालेले असताना देखील दादांचा शेती अन शेतीपूरक व्यवसाय यावरील अभ्यास अन काम करण्याची उमेद वाखाणण्याजोगी आहे.आजही दररोज सकाळी ते दैठण येथील शेतात जाऊन पिकाची पाहणी करतात.कुठं काय कमी,कुठं काय जास्त यावर लक्ष देतात.शेतीत त्यांनी केलेले अनेक प्रयोग अनेकांना दिशादर्शक ठरतात.कडकनाथ चा जोडधंदा असो की फळबाग लागवड या विषयात दादांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 80 वर्षाचा हा तरुण गडी जेव्हा रस्त्यावर उतरला तेव्हा अनेकांनी तोंडात बोट घातली.समाजच्या प्रश्नांची नेमकी जाण असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ते आग्रही आहेत.पत्नी,तीन मुलं सुना, नातवंड यांना एकत्र बांधून ठेवत त्यांनी आदर्श कुटूंब पद्धतीचा वास्तुपाठ घालून दिला आहे.त्यांचा शतक महोस्तव साजरा व्हावा हीच सदिच्छा .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click