विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर
कोणत्याही सर्कस मध्ये सगळ्यात जास्त लक्ष असत ते विदूषक या कलाकार किंवा व्यक्तीवर.कारण त्याला चित्रविचित्र अंगविक्षेप करून लोकांचं मनोरंजन कार्याचा एवढंच माहीत असत तसेच रस्त्याच्या कडेला जर मदाऱ्याचा खेळ सुरू असेल तर त्याच्या हातात जे माकड असतं ते मदारी सांगेल तसच करत असत,कारण त्याला लोकांच्या भावना किंवा डिमांड याच्याशी काही देणंघेणं नसत तर त्याला मालकाच्या तालावर नाचायच असतं.
विदूषक काय अन माकड काय शेवटी माणसं किंवा आपले पूर्वजच ना.पूर्वी रानावनात हिंडायचे,कळपात राहायचे ,शेपटी होती,नंतर नंतर शेपटी गेली,समूहाने राहायला लागले,कालांतराने एकट्या एकट्याने राहायला लागले अन त्यांना माणसं म्हणून मान्यता मिळाली.मात्र माणसाचा मूळ स्वभाव हा माकडाचा आहे हे काही जणांना पाहिलं की लक्षात येत.अशी काहीं माकडं किंवा विदूषक राजकारणात,समाजकारणात सर्वत्र स्वैर संचार करताना आपल्याला दिसतील.
असंच एक व्यक्तिमत्त्व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवरून वाट्टेल ते बडबड करीत आहे.नाव अमोल मिटकरी,अवघ्या चार दोन वर्षात पवारांच्या विशेषतः धाकट्या पवारांच्या संगतीत आलं अन स्टेजवरून फक्कड भाषण करू लागल.या भाषणाच्या जोरावर (वाचाळ) या पठयाने पक्षातील निष्ठावन्त (?) जेष्ठ मंडळींना मागे टाकत थेट विधानपरिषद मिळवली.
आता मालकाने ( पवार ) यांनी एवढे उपकार केले आहेत म्हणल्यावर ते फेडावे लागतील ना.
त्याचा प्रत्यय या माणसाने नुकताच एका सभेत दिला.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय करण्याची जबाबदारी असणारे मंत्री धनंजय मुंडे यांच्या समोर या माणसाने अकलेचे तारे तोडले.
रामरक्षा स्तोत्र अन मारुती स्तोस्त्र यातला फरक ज्या माणसाला माहीत नाही त्याला आमदार करून पवारांनी नेमकं काय साधल अन त्याच्यात काय पाहिलं ते त्यांनाच माहीत.मिटकरी यांनी आपल्या मालकाच्या सुभेदार मंडलीसमोर बोलताना ब्राम्हण समाजाची खिल्ली उडवली.बर उडवली तर उडवली त्याने ब्राम्हणांना काही फरक पडत नाही.असे अनेक मिटकरी सारखे आजवर होऊन गेले ज्यांना ब्राम्हण हे सॉफ्ट टार्गेट वाटतात अन ते आपला कंडू ब्राम्हणावर टीका करून शमवून घेतात.त्यामुळे मिटकरी सारखा फुटकळ माणूस बोलला तर त्यात एवढं कोणी मनावर घेतले नसतं, पण या महाशयांनी अकलेचे तारे तोडताना कन्यादान या पवित्र विधी अन शब्दाचा गैरअर्थ सांगितला अन त्यावर स्टेजवर बसलेले सामाजिक ( ? ) न्यायमंत्री अन प्रदेशाध्यक्ष हसून टाळ्या देतहोते हे फार वाईट.
मिटकरी ची बुद्धी कदाचित तेवढी मोठी नसेल की त्यांना कन्यादान या शब्दाचा अर्थ कळेल.पोटचा गोळा दुसऱ्याच्या घरात पाठवताना काळीज कस पिळवटून निघत ना हे कळण्यासाठी पोटी पोरगी असावी लागते मिटकरी.त्यांना ती आहे की नाही हे त्यांनां माहीत,पण मुंडे यांना तर तीन मुली आहेत.त्यांनी तरी यावर हसन योग्य नव्हतं.बर दुसरा शोध मिटकरी यांनी काय लावला तर लग्न सोहळ्यात ब्राम्हण म्हणतात म्हणे की मम् भार्या समर्पयामि, हा जो काही शोध मिटकरी यांनी लावला आहे ना तो सिद्ध करून दाखवावा.कोणत्याच धर्मात अन जातीत असा शब्दप्रयोग नाहीये.
मिटकरी हे ज्या पक्षाच्या जीवावर आमदार झाले आहेत ना त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना देखील एक मुलगी आहे.त्यांनी तिचा देखील थाटामाटात विवाह केला आहे.मग त्यांनी लग्नात जर कनायदान केलं असेल तर ते मिटकरी यांना मान्य नाही का.त्यांच्या पक्षाचे दुसरे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील स्टेजवर होते,त्यांनी देखील आपल्या कन्येचा विवाह थाटात केला,मग त्यावर देखील मिटकरी यांचा आक्षेप आहे का.
देवाने तोंड दिलं आहे म्हणून काहीही बोलयच का हे ठरवलं पाहिजे माणसानं, पण ज्यांच्यात अजूनही पूर्वजांचे काही अंश शिल्लक आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा तरी कशी करणार.रामरक्षेला मारुती स्तोत्र आणि एक्शलोकी रामायणाचा जर मिटकरी सारखे लोक गैरअर्थ काढणार असतील तर यांच्या बुद्धीची करावी तेवढी कीव कमीच आहे.
हिंदू धर्मात ज्या कन्यादान विधीला अनन्य साधारण महत्व आहे त्या विधी बाबत खिल्ली उडवली जात असेल,धादांत खोटं ब्राम्हण समाजा बद्दल बोललं जातं असेल तर अशा लोकांच्या वक्तव्यावर टाळ्या पिटण्या पेक्षा त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.शरद पवार देव मानतात की नाही,जात पात मानतात की नाही हे त्यांचं त्यांना माहीत,पण म्हणून त्यांनी कधी कोणत्या जातीवर विशेषतः ब्राम्हण समाजावर टीका केल्याचं ऐकिवात नाही.मग ही मिटकरी सारखी वाचाळ लोक एवढी हिंमत करतात कशी हा खरा प्रश्न आहे.
मालकापुढे आपलं इमान किंवा खुसमस्करी करायची म्हणून काहीही बोलावं याला काय अर्थ आहे.जर मिटकरी सारख्या लोकांना एवढंच ब्राम्हण समाजाबद्दल तिटकारा असेल तर त्यांनी खुशाल ब्राम्हण समाजाला वगळून राजकारण करून दाखवाव.यांचे सगळे नेते भूमिपूजन असो की उदघाटन किंवा घरगुती पूजा,सणवार,समारंभ या ठिकाणी ब्राम्हणाला आमंत्रण देतात,विधिवत पूजा करून घेतात एवढंच काय अनेकांच्या मुला मुलींची लग्न देखील देवा ब्राम्हणांच्या साक्षीने झाली आहेत.मग मिटकरी यांच्या नेत्यांनी कन्यादान केलं म्हणजे मम् भार्या समर्पयामि अस केलं अस मिटकरी यांचं म्हणणं आहे का.
ध ला ध अन र ला र जोडल की आपण फार मोठे कवी किंवा लेखक,वक्ते झालो असा काहींचा समज असतो त्यात मिटकरी सारखे लोक अग्रभागी असतात हे त्यांनीच सिद्ध केलं आहे.कुठं,कधी काय बोलावं याच तारतम्य ज्या लोकांना नसत ना ते एक दिवस आपल्यासाहित सगळ्यांना घेऊन बुडतात हा इतिहास आहे.पूर्वीपासून एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे “कामातूराम न भयं न लज्जा,तस आता मिटकरी यांच्यासारख्यांच ऐकून म्हणावं वाटतय की वाचाळविरं न भयं न लज्जा”