August 16, 2022

मरावे परी किर्तीरूपी उरावे !

मरावे परी किर्तीरूपी उरावे !

लक्ष्मीकांत रुईकर ………….! जन पळभर म्हणतील हाय हाय,मी जाता राहील कार्य कायअस म्हणलं जात, पण तुम्ही गेल्यावर सुद्धा तुमची कीर्ती कायम राहावी यासाठी मरावे परी किर्तीरूपी उरावे असं देखील म्हटलं जातं,तुम्ही गेल्यावर तुमच्यासाठी दोन क्षण का होईना प्रत्येकाला हळहळ वाटली पाहिजे अस आयुष्यभर जगा अन वागा.


आयुष्यात दुःख खूप आहेत,मात्र ती कुरवाळत बसला तर सुखाचा शोध घेता येणारं नाही किंवा त्याचा आनंद घेता येणार नाही.त्यामुळं दुःख जरी डोंगरएव्हढं अन सुख जवा एवढं असलं तरी त्या सुखाच्या क्षणात एवढी ताकद असते की डोंगरएव्हढं दुःख माणूस विसरून जातो.


त्यामुळं आपल्या वाट्याला आलेलं दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा त्याला बाजूला सारून पुढं जायला शिकलं पाहिजे.जिच्या जन्मानंतर मुलगी झाली म्हणून नाव चिंधी ठेवलं त्याच चिंधी ने हजारो अनाथ,निराधार लोकांना मायेचं पांघरून दिलं.अन ती समाजाची माई,सिंधू झाली. प्रसंगी स्मशानभूमीत राहून जीवन जगताना एक दिवस आपला शेवट देखील येथेच आहे,त्यामुळे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत इतरांसाठी जगत पाहिजे हा मूलमंत्र घेऊन त्या राखेतून फिनिक्स प्रमाणे झेप घेतलेल्या चिंधीच नाव आज सिंधुताई म्हणून जगात आदराने घेतलं जातं.


अनाथ,निराधार लेकरं असोत की नवऱ्याने टाकलेल्या स्त्रिया या सर्वांसाठी माई एक आधारवड होत्या.जिथं पिकत तिथं विकत नाही अस म्हणतात तसच काहीसं माई च्या बाबतीत झालं,चाळीस वर्षे इतरांची दुःख दूर करणाऱ्या या अनाथांच्या माई वर कर्नाटक सरकार ने शालेय शिक्षणात धडा घेतला पण आपल्या महाराष्ट्रात मात्र उपेक्षाच वाट्याला आली.पण त्यामुळे माई कधी खचली नाही.केंद्राने पदमश्री ने सन्मानित केल्यानंतर देखील माई मधील साधेपणा कधी बदलला नाही.
कोणत्याही कार्यक्रमात माई नेहमी म्हणायच्या की “चांगलं काम करताना लोकांपुढे पदर पसरावा लागतो अन वाईट काम करणाऱ्यांच्या मागे पैसा धावत येतो” हजारो निराधार लोकांना आधार देण्यासाठी माईंनी अनेकांपुढे मदतीचा पदर पसरला अन समाजाने देखील त्यांना भरभरून दिलं.


देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एकदा घेणाऱ्याचे हात घ्यावे अस म्हंटल जात ते माई साठी तंतोतंत खर ठरतं. आपल्या दोन्ही हातांनी माईंनी लोकांना सुख वाटलं,त्यांच्या वाटेतील काटे दूर करत आयुष्यात फुलं अन सुख यावं यासाठी प्रयत्न केले.


तुम्ही किती वर्षे जगलात यापेक्षा तुम्ही कस जगलात याला जास्त महत्व आहे.माईंच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर सोशल मीडियावर श्रद्धांजली चा महापूर आला,हजारो लोकांच्या मोबाईलवर क्षणात स्टेट्स ला माई आल्या.अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.ही ताकद संघर्षाची आहे,समाजासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्याची पावती आहे.ज्या माई ला घरच्यांनी नाकारल तिला समाजाने स्वीकारले अन डोक्यावर घेतलं. माईंच्या कार्याचा वसा कायम पुढे चालू ठेवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल .
लक्ष्मीकांत रुईकर ,न्यूज अँड व्युज ,बीड

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click