November 26, 2022

” किडा “
वळवळतो की चुळबुळतो

<em> ” किडा “</em><br><em>वळवळतो की चुळबुळतो</em>

तर विषय आहे किडा
माझं असं प्रामाणिक मत आहे की
आपल्या देशात
देशाच्या लोकसंख्ये एवढे “किडे” अस्तित्वात आहेत
ही गोष्ट फक्त आपण भारतीय लोकांनाच लागू होत असेल असे नाही
इतर कोणत्याही देशातल्या लोकांना हे लागू होतं असावे
पण लिहणारा कधी परदेशी गेला नाही म्हणून त्याला तिथली तेवढी माहिती नाही
तर असो
देशातील लोकसंख्ये एवढे किडे जर असतील तर त्यातल्या त्यात आपण आपल्या
राज्या बद्दलच बोलू
थोडक्यात मराठी माणसाला बद्दल
त्यांच्या कडील किड्यांची “विशेष किडे” अथवा “महाकिडे”अशी गणना करता येऊ शकते
बरं हे किडे प्रत्येक माणसाच्या अंगात असतातच
हं पण
साधारणतः हे किडे
वेळोवेळी किंवा अवेळी ते आहेत त्यांची जाणीव लोकांना होऊन
जाते अथवा लोक करून देत असतात
आपण इथे हिशोबाला प्रत्येक व्यक्ती किमान एक तरी कीडा हे प्रमाण गृहीत धरूनच चालावे या किड्यांची माणसाच्या अंगात राहण्याचे वेगवेगळे ठिकाण
आहेत
म्हणजे आपण
त्याला किडे प्रकार म्हणूयात
“डोक्यातील किडे”
“तोंडातील किडे”
“पोटतील किडे”आणि अजून …. असो
आपण पुढचं समजू शकता
या शिवाय काही राजकीय किडे काही कवी किडे तर काही सामाजिक किडे
अशी सोयी नुसार त्यांची वर्गवारी करता येऊ शकते
असे अजून अनेक किडे असू शकतात इथे आपण काही नमुनादाखल घेतले आहेत
तर आता
डोक्यातील किडे या प्रकारात काय होत एकतर समोरील व्यक्ती आपल्याला काही समजून सांगत
असेल आणि ते आपल्याला कळतं नसेल अथवा आपण ते लक्ष्यात घेत नसतोल तर
तो ” तुझ्या डोक्यात काय किडे पडलेत का”
असे म्हणतो जनरली
परिस्थिती अगदी या उलटही असू शकते कधीकधी
आपण कोणाला समजून सांगतोय आणि तो समजून घेत नसेल अथवा त्याला कळतं नसेल तर आपण त्याला हेच उलट करून
म्हणतो “डोक्यात किडे पडलेत का तुझ्या” किंवा “आरे बस ना भौ किती सांगतो आमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आलीय”
हा सहज सौहार्दापूर्ण संभाषण करून जातो
हा प्रकार मराठी माणसाच्या अंगात रुजला आहे

त्यानंतर येतात ते
“तोंडातील किडे”
हे किडे
समोरील व्यक्ती किंवा आपणच एखादया वेळी नेमकं नको ते बोलून जातो
लोकं याचा वापर एक सौजन्यशिवी म्हणूनही करतात
“किडे पडो तुझ्या तोंडात”किंवा “ह्याच्या तोंडातला किडा नाही त्या वेळी वळवळला
या अगदी सहज घडणाऱ्या आणि वाटणाऱ्या गोष्टी
आहेत
मात्र होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करण्याची ताकद या “तोंडातल्या किड्यां ” मध्ये असते
निरर्थक अथवा वायफळ बोलणे समोरच्या थोडीही विचार न करता
वचावचा बोलत
राहणे या सारख्या
गोष्टी एकच व्यक्ती नेहमी भेटला की असे करत असेल तर समजून जायचे
याच्या तोंडातील किड्यांची ही किमया आहे
त्या मानाने
पोटातील किडे मात्र काही शांत तर काही चुळबुळ करणारे असतात
कोणाची एखादी सिक्रेट गोष्ट अथवा खासगी गोष्ट सगळ्यांना सांगणे
या किड्यां मुळे शक्य
होते
“ह्याचा पोटात एवढे किडेत की काही गुपचूप बसतच नाहीत”
“ऐनवेळी ह्याचा किडा वळवळला”
या सारखे बोलणे सहज निघून जाते


आता बघुयात राजकीय किडे
सर्वात घातक आणि डेंजरणाक
किडा आहे हा
आपल्या देशात या किड्यांचा काहीच नेम नसतो
निवडणुकीच्या तोंडावर यांची वळवळ जाणवू लागते
माणसाच्या वयाच्या कोणत्याही वर्षी हा किडा अंगात घुसून संधीसाधूपणा करायला मोकळा असतो एखाद्याला उगी वाटायला लागते आपण निवडणूक लढली पाहिजे
लोकं आपल्या नक्की निवडून देतील
हे जे त्याचे “वाटणे”
आहे न हाच खरंतर त्याचा एक राजकीय किडा असतो
आणि तो सारखा वळवळतो
मग तो व्यक्ती कोणावरही कितीही पैसे उधळायला मोकळा होतो
तसं पाहिलं तर त्याच्या व्यक्तिमत्वाची तेवढी उंची पण नसते,
राजकीय समज सुद्धा किती असेल याबद्दल शंका येऊ लागते
पण त्याच्या अंगातील राजकीय किडा काही केल्या गप्प बसत
नसतो
आपण कोणीतरी “भावी”आहोत
अशी उगीच समज त्याला होऊ लागते जनरली नगरसेवक किंवा गावातील सरपंच निवडणुकीत हे किडे जास्त वळवळताना आढळतात
यांच्या सोबत काही सामाजिक किडे पण असतात
स्वतःच्या सगळ्या गोष्टी स्थिर स्थावर झाल्यावर किंवा जुजबी काही लोकोपयोगी सामाजिक कामे केली असतील
तर
या किड्यांची चुळबुळ लगी सुरू होते
अर्थत समाजात काही आदर्श सामाजिक कार्य करणारे लोकं एन जी ओ आहेत काही संघटना आहे नक्कीच यात मोडत नाहीत
पण इतरांची ही खुमखुमी अधून मधून दिसते
लोकांना बिनभोभाट मदत करणे या पेक्षा त्याचा गाजावाज कसा करता येईल
यावर सामाजिक किड्यांचे जास्त लक्ष्य असते
समाज अश्या लोकांना लगेच ओळखतोही
पण या किडे प्रकारात प्रामाणिक कार्य करणारे लोकांना कृपया इथे काऊंट करू नये ही विनंती


असो आता
कवीकिडे
हा फार भयंकर प्रकार आहे भौ
मला आजकाल या कवीकिड्यांची प्रचंड भीती वाटते समाज माध्यमांवर या किड्यांची रेलचेल तुम्हाला दिसेल रोज कुठूनही काहीही शब्द हुडकायचे
त्याला र ला ट जोडायचे बळबळ एका शब्दाचे का होईना यमक जुळवायचे आणि चारोळी आणि कविता करायची
खरंतर कविता लिहणे ही एक कला आहे
एक साहित्य प्रकार आहे ती अशी रोज प्रसवल्या जातच असेल असे वाटतं नाही
पण रोज काहीतरी चारोळी किंवा ज्याला तो कविता म्हणतो तो लिहतोय याचा
अर्थही त्याच्या कडील ही कला नाहीये
तर हा त्याच्या अंगात घुसलेला “कवीकिडा”आहे
कला आणि घुसलेला किडा यामधील सूक्ष्म फरक लक्ष्यात घेतला पाहिजे
कले ची आणि या किड्यांची तुलना होऊच शकत नाही
पण सुमार सवंग गोष्टी आवडणारे आणि लिहणारे आता पायलीचे पन्नास झाले आहेत
त्यांचा मराठी भाषेवरील अत्याचार सहनशिलतेच्याही पलीकडे असतो
रहेमानी किडा म्हणून एक किडा प्रकार आहे
याची नेमकी कन्सेप्ट कोणालाही सांगता येणार नाही
इतका हा किडा गहन आहे
पण हा किडा फार मोजक्या लोकांच्या अंगात सापडतो
म्हणे
या किडांच्या प्रकारची जागा आणि गुणवैशिष्ट्ये प्रकार जरी थोडयाफार फरकाने वेगळी
असली तरी
माणसाच्या अगदी पाळण्यात असल्या पासून ते वृद्धत्व येई पर्यंत किंबहुना
काही लोकांच्या तर “तिरडी पर्यंत सोबत”
हे किडे करत असतात
खरंतर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
वगैरे या म्हणी कधी कधी मला उपरोधिक वाटून जातात
लोकांना पाळण्यात त्या बाळाचे किडेच दिसलेले असतात
पण तस छोट्या बाळाला स्पष्ट म्हणणे योग्य
नसते म्हणून ही किड्यांची बोळवण “बाळाचे पाय” वैगेरे
असे गोंडस आवरण लावून केलेली
असते
लहानपाणीचे किडे तारुण्यात अगदीच वेगळे रूप घेतात
तरुणपणी जे किडे अंगात घुसतात किंवा त्यांच्या प्रगटीकरनाची जाणीव लोकांना
होते हे
“तरुणकिडे” यावर पुढील आयुष्याच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात
तारुण्यातील किडे कधी सकारात्मक ऊर्जा देऊन जातात तर कधी नकारात्मक ऊर्जा
देतात
यांच किड्यांच्या जीवावर माणूस त्याची पुढील वाटचाल करत असतो
प्रौढपणातील किडे थोड्या स्वरूपात नव्हे तर बऱ्याच अंशी “समंजस”असतात त्यांची प्रसंगनरुप वळवळ होते
पण एकप्रकारची
“संयमी झालर”त्या किड्यांना असते
पण हे समंजस किडे माणसाचे व्यक्तिमत्व बनवतं असतात
ही खूप मोठी जिममेदरी यांना पार पाडावी लागते
वय वर्षे “साठी पार”लोकांच्या किड्यांची तर
“बात ही कुछ और है” आयुष्यातील पश्चाताप किंवा खंत अश्या दोन्ही प्रकारची किडे इथे दिसून येतात काही जणांना
ज्या गोष्टी आयुष्याने देऊनही आपल्या अंगातील काही किड्यांन मुळे ती गोष्ट
मिळालेली नसणे,
याची खंत बाळगणारे असतात
तर काही मात्र स्वतःच्या अंगातील “हिरवटपणा”प्रसंगी जिंदादिली व्यक्त करणारे
असतात
वय निघून गेलेले असते काही लोकांना
“बऱ्याच गोष्टी”
करायच्या राहिलेल्या असतात
तर काहींचे ते मिळूनही समाधान हरवून बसवनारे किडे वळवळू लागतात
माझे काही जेष्ठनागरिक मित्र आहेत
तर काही ओळखीचे आहेत
त्यांच्या पैकीच एक काका वय वर्षे असेल सत्तर बहात्तर त्यांचं ते रस्त्याने चालताना
त्यांना “कुत्रे”दिसले की त्याला दगड मारायची
आजही सवय आहे
मग
सोबत कोणीही असो
रस्त्यावरील कुत्र्याला ते हमखास दगड मारणार म्हणजे मारणार
आता बोला
काय म्हणावं या गोष्टीला तर हा अंगात घुसलेला किडा आहे
याला आपण अवगुण म्हणण्या ऐवजी किडा म्हणलं तर हे आपल्या साठी एन्जॉयबल होऊन जाते
असे अनेक उदाहरणे आपल्यालाही घेता येतील
आताही मला प्रचंड “किडे खाऊ” किंवा “किडेपाडू”मित्र
आहेत तर काही महाभाग मित्र मला सुद्धा “किडेखाऊ आहेस”असे चिडवण्यासाठी म्हणतात
“किडेखाऊ”पणा
तसा कमीजास्ती प्रमाणात प्रत्येक व्यक्तीकडे जाणवू लागतो
साठी नंतर स्वतःमधील जिंदादिली कायम टिकवण्यासाठी
ह्या किड्यांची खूप मदत होते म्हणे
अंगातील किड्यांची ही सोबत किंवा ताकद त्यांची तीव्रता
वया वर्षे ऐंशीच्या पुढे कमी कमी व्हायला लागते
आणि शेवटी तिरडीवर त्या माणसाचा आणि त्याच्या अंगातील किड्यांचा शेवट होतो
तर
हे सर्व व्यक्तीकिडेमात्रा
माणसांच्या स्वभावाचे प्रसंगनरुप दर्शन
करून देणारे
एक प्रकारचे समाजपयोगी कार्य करणारे “समाजसेवी”
किडे आहेत
असे मला वाटते
इथून पुढे आपण आता
” व्यक्ती तितक्या प्रकृती” या म्हणी ऐवजी
“व्यक्ती तितके किडे”
असे म्हणायला
काय हरकत आहे
धन्यवाद !!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विकास वा उमापूरकर
(न्यूज अँड व्हीऊज डिजिटल पोर्टल बीड)
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click