February 2, 2023

सहानुभूती, समानभूती, कणव,पुळका !

सहानुभूती, समानभूती, कणव,पुळका !

न्यूज अँड व्युज चे मुख्य संचालक विकास उमापूरकर यांच्या स्वानुभवातुन प्रसवलेल्या भावना आपणा सर्वांसाठी येथे देत आहोत .

सहानभूती
दाखवायची की बाळगायची
आपल्या दैनंदिन आयुष्यात असे खूप प्रसंग येतं असतात
जेव्हा आपण इतरांच्या प्रती सहानभूती एकतर दाखवत असतो किंवा बाळगुण असतो
ढोबळमानाने दुसऱ्याच्या दुःखाच्या किंवा वाईट घटनेच्या संबधी प्रगट स्वरूपात दाखवण्यात येणारी आस्था म्हणजे सहानभूती(सिंपंथी)
म्हणता येईल
आपल्या नात्यातील किंवा संबंधातील लोकांच्या संदर्भात होणाऱ्या दुःखात माणुसकीने आपणही सहभागी आहोत
हे दर्शवण्यासाठी
आपण त्याच्याशी सहानभूतीने राहतो किंवा वागतो
सहानभूती ही वक्तीच्या मनाची अवस्था
आहे
जनरली कठोर अथवा निर्दयी मनाचे लोकांना सहानभूती वाटतं
नाही असा समज असतो
एका व्यक्तीने निरहेतुक अथवा निस्पृहपणे दुसऱ्याच्या प्रतीची दर्शवलेली ही सहानभूती प्रसंगी एखाद्या व्यक्तीच्या मनालाही दुखावून जाते
उदाहरणच द्याचे झालेतर आपण एखाद्या दिव्यांग व्यक्तीला त्याच्या दिव्यांगपणाबद्दल
ची जाणीव ठेवून त्याने न मागता काही मदत
केली तर
ती कदाचित त्याचे मन दुखवणारी ठरू
शकते अथवा अभिमानी मनस्वी लोकांना कारणाने किंवा विनाकारण दाखवली सहानभूती आवडत
नाही किंवा त्यांच्या प्रति ती बाळगलेली सुद्धा पटत नसते
लोकं आपल्या प्रति सहानभूती दर्शवतात यात मानी मनस्वी लोकांना स्वतःचा दुबळेपणा वाटून जातो त्या व्यक्तीची दुःख अथवा वाईट प्रसंग झेलण्याची क्षमता
कमी आहे हे अप्रत्यक्षपणे सिद्ध होतं असते म्हणूनही कदाचित काही लोकांना या सहानुभूतीचा तिटकारा वाटतो
सहानभूतीच्या पुढील एक पायरी म्हणजे समानभूती ज्याला इंग्रजी मध्ये एपंथी म्हणतात
आता
सहानभूती आणि समानभूती मध्ये नेमका काय फरक असतो
तर दुसऱ्याच्या दुःखाच्या प्रतीची आस्था दर्शवणे म्हणजे सहानभूती हे तर आपण आधीच म्हणलो आहोत
पण समानभूती मध्ये दुसऱ्याच्या दुःखा एवढेच दुःख आपल्याला होणे त्याला झालेल्या हानी नुकसान एवढेच नुकसान किंवा
हानी आपल्यालाही झाले आहे
हे दर्शवणे किंवा सिद्ध करणे म्हणजे समानभूती यामध्ये आपण आणि समोरील व्यक्ती दुःखाच्या एकाच समान पातळीवर असतो आनंदाच्याही बाबतीत आपण सहानभूती आणि समानभूती व्यक्त करत असतो
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात खरोखरच आनंदनिय घटना
घडली असेल अश्या वेळी आपण त्याला त्याच्या आनंदाच्या प्रतीची सहानभूती दाखवत असतो
सहानभूती किंवा बोली भाषेत ज्याला आपण उपहासाने
कोरडा पुळका म्हणतो हे भाषेतील समानार्थी
शब्द बऱ्याच वेळा
आपल्याला नीट व्यक्त करता येतीलच याचा
नेम नसतो नेमकं आपण
काय प्रगट करत आहोत आणि समोरील व्यक्ती त्याचा आपल्याला अभिप्रेत असलेलाच अर्थ घेईल
याचा कधी कधी अंदाज बांधता येत नाही
या सहानुभूतीच्या भावकी मधील एक प्रकार म्हणजे
“भूतदया”
या भूतदया प्रकारात व्यक्तीची सहानभूती कुठल्याही माणसा
बद्दल नसते
तर इतर सजीव प्राणी मात्रा संदर्भात बाळगलेली आस्था म्हणजे भूतदया
जसेकी कोणाला
घोड्या बद्दल प्रेम आकर्षण असते तर कोणी कुत्रा मांजर
पोपट या पाळीव प्राण्यांच्या संदर्भात वेळोवेळी सहानभूती बाळगून असतो
आता
सहानभूतीच्या थोडी पुढील स्टेप म्हणता येईल ती म्हणजे
कणव
प्रेम माया ममत्व या भावनेने एक व्यक्ती दुसऱ्याच्या प्रति जेव्हा वाजवी पेक्षा आणि अपेक्षेपेक्षा जास्त सहानभूती ठेवतो
तेव्हा त्याचे रूपांतर कणवे मध्ये झालेले असते एखाद्याला त्याची कणव आली
असे ढोबळमानाने म्हणता येईल
थोडक्यात अति सहानभूती निर्माण होणे
पण कणव ही व्यक्ती
सापेक्ष असते
आपल्याला ज्याच्या बद्दल सहानभूती वाटते किंवा आपण बाळगून आहोत किंवा
कोणाची कणव आली असेल तर जरूर नाही की इतरांना पण
ती यावी अर्थात दुःखद प्रसंग तसा असेल तर बहुतेक वेळा बहुतांशी लोकांना ही कणव(ज्याला बोली भाषेत कीव पण म्हणतात)
आलेली असू शकते
नाते सबंध कोणा सोबत कसे आहेत आणि
त्याचे परिणाम काय होणार आहेत यावर कीव
करणे किंवा येणे अवलंबुन आहे
सहानभूती बाळगली आणि त्याचे भान ठेवून त्यासोबत राहलो
म्हणजे आपण त्याच्या वर उपकार केले
आहेत असे समजण्याचे कारण नसते
समाजात घडलेल्या संवेदनशील घटना
बाबत आपण सहानभूती बाळगतो आणि त्यातून स्वतःच्या कुवती प्रमाणे समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो
कोणाच्या मदतीला धावून
जाणे ही बाब सुद्धा सहानभूती मधूनच घडलेली गोष्ट
असते
स्वच्छ निर्मळ मनाच्या
निकोप मनाच्या व्यक्तीलाच सगळ्या जगाचे कल्याण व्हावे असे वाटते
याच सहानुभूतीच्या भावनेतून संत साहित्याची निर्मिती झालेली दिसते
कदाचित याच भावनेतून
संत ज्ञानेश्वर माऊली ने “पसायदान” मागितले असावे असे वाटून जाते
एका व्यक्तीने जगकल्याणाच्या प्रति पसायदानाच्या माध्यमातून दाखवलेली ही सहानभूती अलौकीकतेचे सगळ्यात मोठे उदाहरण ठरले आहे
शेवटी एक नक्की म्हणता येईल
सहानभूती प्रसंगी बाळगून दर्शवावी म्हणजे जगणे प्रेमळ आणि आनंदी होते

विकास वा उमापूरकर
बीड
(न्यूज अँड व्हीऊज
डिजिटल पोर्टल)
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click