बीड- शासकीय सेवेसाठीची कोणतीही परीक्षा असली तरी त्यात बीड वासीयांनी काही कुटाने केले नाहीत अस अलीकडच्या काळात घडलेले नाही.टीईटी असो की आरोग्य भरती किंवा म्हाडा ची परीक्षा प्रत्येक ठिकाणी पेपरफुटी, मार्क वाढवणे असे प्रकार बीड वासीयांनी केले आहेत.आताही म्हाडाच्या परीक्षेत आपल्या नावावर डमी परीक्षार्थी बसवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे बिडकरांची मान शरमेने खाली गेली आहे.
राज्यातील टीईटी घोटाळा,आरोग्य विभाग पेपरफुटी यामध्ये बीफ जिल्ह्यातील संजय सानप यांच्यासह अनेकांचा सहभाग स्पष्टपणे समोर आला आहे.कोटीही परीक्षा असली की त्याचा पेपर फोडता येतो का,ते नाही जमल्यास पेपर झाल्यावर काही सेटिंग लागते का हे कुटाने करणारे बीडमध्ये अनेकजण आहेत.त्यातूनच आज काहीजण जेलची हवा खात आहेत.
नागपूर येथे म्हाडाच्या अभियांत्रिकी पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी ९ फेब्रुवारी रोजी परीक्षा झाली. यावेळी नागपूरच्या एमआयडीसी आयकॉन डिजिटल झोन क्र. २ मध्ये परिक्षार्थ्यांना आत सोडताना कागदपत्रे तपासणी सुरू होती. स्डिजिटल स्वाक्षरी पडताळताना अभिषेक याच्या स्वाक्षरीत तोतया परिक्षार्थ्याने अभिषेका केले. त्यामुळे स्वाक्षरी जुळेना. बनावट परिक्षार्थ्याने आपण पकडले जाऊ, या भीतीने तिथून पोबारा केला. त्याचे नाव समोर आले नाही. मात्र अज्ञात तोतया परीक्षार्थीसह मूळ परिक्षार्थ्यावर नागपूर एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील मूळ परीक्षार्थी अभिषेक भारतराव सावंत (२८, आहेर चिंचोली ता. बीड, हमु.शाहूनगर, पाण्याच्या टाकीजवळ, बीड) यास १० रोजी अटक करण्यात आली आहे. नागपूर एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांसह शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक बाळराजे दराडे, पो. ना. विष्णू चव्हाण, शिवनाथ उबाळे, रवींद्र आघाव, सचिन आगलावे यांनी आहेर चिंचोली येथे त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत तोतया परिक्षार्थ्याचा खुलासा होणार असून मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते